Ireland wicketkeeper Mary Waldron unique helmet : महिला टी 20 वर्ल्डकपमधील टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात आयर्लंडची विकेटकिपर मेरी वॉल्ड्रॉन (Mary Waldron) अनोखे हेल्मेट (unique helmet)घालून मैदानात उतरली होती. तिचे हे हेल्मेट पाहून टीम इंडियाचे खेळाडूच अचंबित झाले होते. तिच्या या हेल्मेटचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा :  टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, DLSमेथडनुसार आयर्लंडवर विजय 


 


आयर्लंडची विकेटकिपर बॅटसमन मेरी वॉल्ड्रॉन (Mary Waldron) अनोखे हेल्मेट घालून मैदानात दिसली होती. आयर्लंडच्या या विकेटकिपरचे हेल्मेट नेहमीपेक्षा जरा वेगळे होते. त्यामुळे क्रिकेट फॅन्ससह टीम इंडियाचे खेळाडू अवाक झाले होते. तिच्या या हेल्मेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 क्रिकेटमध्ये हेल्मेटची रचना अशी आहे की, त्यावर धातूच्या ग्रिलने वरपासून झाकलेला जाड थर असतो, जो डोक्याशिवाय चेहरा झाकण्यासाठी बाजूंना बोल्ट केला जातो. या हेल्मेटमुळे डोक्यावर बॉल लागण्यापासून सरंक्षण होते. मात्र मेरी वॉल्ड्रॉन (Mary Waldron) अनोखा हेल्मेट घालून मैदानात आली होता. तिचा हा हेल्मेट बेसबॉल किंवा अमेरिकेत फुटबॉल खेळ खेळणाऱ्या खेळाडूंसारखा दिसत होता.


 


हे ही वाचा : हार्दिक पंड्या नताशाचे रोमँटिक फोटो आले समोर, पाहा PHOTO


 


विशेष म्हणजे मेरी वॉल्ड्रॉनने (Mary Waldron) अशाप्रकारचे हेल्मेट घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये, वॉल्ड्रॉनने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान हेच ​​हेल्मेट घातले होते. त्यावेळी देखील तिच्या हेल्मेटची चर्चा झाली होती. 38 वर्षीय वॉल्ड्रॉन ही या स्पर्धेतील सर्वात जुनी खेळाडू आहे. सध्या ती हेल्मेटमुळे चर्चेत आहे.


मेरी वॉल्ड्रॉनचा (Mary Waldron) हेल्मेट सोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. अनेक नेटकऱ्यांनी तिला स्वत:चा बचाव करण्याचे सल्ले दिले आहेत. तर काहिंनी तिच्या हेल्मेटची तुलना दिनेश कार्तिकच्या हेल्मेटशी केली आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.


 


हे ही वाचा :  'नॅशनल क्रश'च शतक हुकलं, पण टीम इंडियाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं 


 


असा रंगला सामना


टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (harmanpreet kaur)टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या (smriti mandhana) 87 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 155 धावा केल्या होत्या. या धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या आयर्लंडने 2 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्या दरम्यान पाऊस सुरु झाला होता. त्यावेळेस डकवर्थ लूईस नियमानुसार टीम इंडिया 5 धावांनी पुढे होती. त्यामुळे सामना पुन्हा सुरु न होणार असल्याने डकवर्थ लूईस नियमानुसार (duckworth lewis method) टीम इंडियाने 5 धावांनी आयर्लंडचा पराभव केला. आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.