नवी दिल्ली : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड विजयाच्या प्रबळ दावेदार आहेत, असं भाकित भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं केलं आहे. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये भारतानं सातत्यानं केलेल्या चांगल्या कामगिरीचंही जहीरनं कौतुक केलं. भारत यावेळी तिसरा वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीत आहे, पण भारताला इंग्लंडपासून सावध राहिलं पाहिजे, असं मत जहीर खाननं मांडलं. २०११ साली भारतानं जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या विजयाचा हिरो जहीर खान होता. या वर्ल्ड कपमध्ये जहीरनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये जहीरनं ९ मॅचमध्ये २१ विकेट घेतल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जहीर खान हा बुधवारी दिल्लीमध्ये फेरीट क्रिकेट बॅश (एफसीबी) लीगच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी बोलताना जहीर म्हणाला, 'यावेळच्या वर्ल्ड कपचा फॉरमॅट वेगळा आहे. प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळणार आहे. भारतीय टीमनं मागच्या बऱ्याच काळापासून मर्यादित ओव्हरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला सेमी फायनलला पोहोचायला अजिबात त्रास होणार नाही.'


इंग्लंडला फायदा मिळेल


'भारत आणि इंग्लंड सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. पण इंग्लंड घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे त्यांना जास्त फायदा मिळेल. भारत आणि इंग्लंडच्या टीम या वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचू शकतात. भारतीय टीम ही आता वर्ल्ड कपसाठी तयार आहे, त्यामुळे आता जास्त डोकेफोड करायची गरज नाही', अशी प्रतिक्रिया जहीरनं दिली.


भारताच्या बॉलिंगचं कौतुक


'भारतीय टीममध्ये खलील अहमद, मोहम्मद सीराज, शार्दुल ठाकूर, सिद्धार्थ कौल यांच्यासारखे फास्ट बॉलर येत आहेत. भारताच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे. तुमचे पहिल्या ११ मध्ये नसलेले खेळाडू जेवढे मजबूत असतील, तेवढीच तुमची टीमही मजबूत असेल. या बॉलरमध्ये जेवढी स्पर्धा असेल तेवढा टीमचा स्तरही वाढेल', असं जहीर म्हणाला.


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा यशस्वी दौरा उरकून भारत आता घरच्या मैदानात पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल. या दौऱ्यामध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. 


जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम