close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता काही महिनेच उरले आहेत.

Updated: Feb 4, 2019, 05:46 PM IST
जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

मुंबई : यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता काही महिनेच उरले आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये या वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारतीय टीममध्ये कोणत्या खेळाडूंची निवड होणार हे जवळपास निश्चित असलं, तरी काही नावांबद्दल मात्र अजूनही संभ्रम कायम आहे. भारतीय टीमचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं वर्ल्ड कपसाठीची त्याची टीम निवडली आहे.

विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीम चांगलं प्रदर्शन करत आहे. ड्रेसिंग रूममधलं वातावरणही चांगलं आहे. या टीममधले बहुतेक खेळाडू युवा आहेत, त्यामुळे सध्या टीममध्ये जे आहेत यातलेच खेळाडू वर्ल्ड कपच्या टीममध्ये असतील, असं जहीर खानला वाटतंय. 

वर्ल्ड कपआधी सर्वोत्तम टीम निवडण्यासाठी भारतीय टीम प्रशासन आणि निवड समिती वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहे. यापैकी जे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील त्यांचाही वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये विचार होईल, असे संकेत भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतानं कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला अनेकवेळा विश्रांती दिली आहे. तर शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूलाही संधी दिली आहे.

वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूला संधी द्या- गावसकर

वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा असल्यामुळे टीममध्ये ४ फास्ट बॉलर टीममध्ये असावेत, असं मत जहीर खाननं व्यक्त केलं. तसंच टीममध्ये अंबाती रायुडू किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते, असं जहीर म्हणाला.

अशी आहे जहीरची टीम

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, एमएस धोनी, अंबाती रायुडू/दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, केएल राहुल किंवा एक फास्ट बॉलर 

गौतम गंभीरची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम