IND vs SL : जीतम्...जीतम्...जीतम्...! रोहित सेनेकडून लंकादहन, सिरीज जिंकत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात!
कोलकात्यामध्ये आज श्रीलंका विरूद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. 4 विकेट्सने टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.
IND vs SL 2nd ODI: कोलकात्यामध्ये आज श्रीलंका विरूद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. 4 विकेट्सने टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने वनडे सिरीज देखील जिंकली आहे. श्रीलंकेच्या टीमने दिलेलं 216 रन्सचं आव्हान पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला 43.2 ओव्हर खेळाव्या लागल्या. याशिवाय टीम इंडियाने 6 विकेट्स देखील गमावल्या.
केएल राहुलची उत्तम फलंदाजी
आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक रन्स केले. भारताचे विकेट्स पडत असताना केएल राहुलने उत्तम फलंदाजी केली. राहुलने 103 बॉल्समध्ये 64 रन्सची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला आहे. आजच्या त्याच्या खेळात 6 चौकारांचा समावेश आहे.
टीम इंडियाचे बाकी फलंदाज ढेर
केएल राहुल सोडून टीम इंडियाच्या इतर कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. हार्दिक पंड्या 36 तर श्रेयस अय्यरने 28 रन्स करत राहुलची साथ दिली. मात्र आजच्या सामन्यात भारताचे दोन्ही ओपनर शुभमन गिल आणि रोहित शर्मा फेल ठरले. याशिवाय विराट कोहलीला देखील साजेसा खेळ करता नाही.
श्रीलंका 215 वर ऑल आऊट
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने (dasun shanaka) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नव्हती. श्रीलंकेकडून अविष्का फर्नाडों (avishka fernando) आणि नुवांदु फर्नांडो सलामीला उतरले होते.मात्र श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नाडों 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कुसल मेंडीसने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी काही अंशी डाव सांभाळला तर होता मात्र त्यांना मोठ्या धावसंख्या गाठता आली.
कुसल मेंडीस 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुनिथ वेलालगेने 32 धावा केल्या होत्या. तर नुवांदु फर्नांडोने अर्धशतक ठोकले आहे.या खेळाडूं व्यतिरीक्त एकाही खेळाडूचा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आणि श्रीलंकेचा संघ 39.4 ओव्हरमध्ये 215 वर ऑल आऊट झाला.
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने (Kuldeep yadav) प्रत्येकी 3 विकेट घेतल्य़ा आहेत. तर उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.