लंडन : महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारतानं श्रीलंकेचा १६ रन्सनी पराभव केला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधला भारताचा हा सलग चौथा विजय आहे. 
भारतानं ठेवलेल्या २३३ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये २१६/७ पर्यंतच मजल मारता आली. भारताच्या झुलन गोस्वामी आणि पूनम यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर दीप्ती शर्मा आणि एकता बिश्तला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंकेच्या सुरंगिकानं ६१ रन्स बनवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ५० ओव्हरमध्ये २३२/८चा पल्ला गाठला. दीप्ती शर्मानं ७८ रन्स आणि मिथाली राजनं ५३ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.


पॉईंट्स टेबलमध्ये आता भारत ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या चार पैकी चारही मॅच जिंकल्या आहेत. ८ गुण असलेली ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे.