भारताला जिंकण्यासाठी हव्यात २४३ धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावा केल्या.
नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र त्यांची सुरुवात संथ झाली. गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या डेविड वॉर्नरने या सामन्याक ५३ धावांची खेळी साकारली. ट्रॅव्हिस हेडने ४२ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.
भारताकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेलने १० षटकांत ३८ धावा देताना ३ बळी मिळवले. तर बुमराने दोन विकेट मिळवल्या.