India vs England 4thTest | चौथ्या कसोटीत सामन्यात विराट-रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? नक्की काय झालं?
चौथ्या कसोटीच्या (England vs India 4th Test Day 1) पहिल्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मैदानात काहीतरी वाद झाला असल्याचं म्हटलं जात आहे.
लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात केनिंग्टन ओव्हल इथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना (India vs England 4thTest) खेळवला जात आहे. टीम इंडियाची पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजंना जोरदार मुसंडी मारत दमदार कमबॅक केलं. टीम इंडियाने पहिल्या डावात शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (Team India Captain Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दिवसखेर इंगंलडला 3 धक्के दिले. त्यामुळे टीम इंडियासाठी पहिला दिवसाचा शेवट गोड झाला. मात्र पहिल्या दिवसादरम्यान विराट आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मैदानात काहीतरी वाद झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (india vs england 4th test day 1 captain virat kohli and rohit sharma video viral on social media at kennington oval london)
रोहित-विराटमध्ये वाद?
व्हायरल होत असलेल्या व्हीडिओत, रोहित आणि विराटमध्ये चर्चा सुरु असल्याचं दिसतंय. मात्र विराटच्या मुद्द्यावर रोहित असमाधानी असल्याचं दिसून येतंय. दोघेही स्लीपमध्ये फिल्डिंगला असताना ही चर्चा रंगली. मात्र रोहित विराटने सांगितलेल्या मुद्द्यावरुन नाखूश असल्याचं दिसून येतंय. मात्र या दोघांमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावरुन ही चर्चा झाली, याबाबत समजू शकलेलं नाही. मात्र या दोघांमध्ये काहीतरी मतभेद आहे, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय.
पहिल्या दिवसाच्या खेळाचा धावता आढावा
इंग्लंडने टॉस जिंकला. टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची सावध सुरुवात झाली. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या भेदक माऱ्याच्या समोर भारताने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्या. मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याने अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतक लगावल्यानंतर विराटने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विराटने 50 धावा केल्या. मात्र विराटचा अपवाद वगळता टॉप आणि मीडल ऑर्डरच्या इतर कोणत्याही बॅट्समनला चांगली खेळी करता आली नाही. भारताची 7 बाद 127 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे टीम इंडियाच्या 150 धावा होणंही अशक्य वाटत होतं.
मात्र शार्दुल ठाकूर टीम इंडियासाठी तारणहार ठरला. टीम इंडिया अडचणीत असताना शार्दुलने निर्णायक क्षणी जोरदार फटकेबाजी करत दणदणीत अर्धशतक ठोकलं. विशेष म्हणजे शार्दुलने सेहवाग स्टाईलमध्ये सिक्स मारत अर्धशतक ठोकलं. शार्दुलने 7 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. शार्दुलने अखेरीस केलल्या या खेळीमुळे टीम इंडियाला 191 धावांपर्यंत पोहचता आलं. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली रॉबिन्सने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
इंग्लंडचा पहिला डाव
दरम्यान टीम इंडियाला ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंड बॅटिंग आली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने इंग्लंडला चौथ्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. त्याने आधी रॉरी बर्न्स तर त्यानंतर हसीह हमीदला आऊट केलं. बर्न्सने 5 धावा केल्या. तर हसीबला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 2 बाद 6 अशी झाली.
टीम इंडियाच्या मार्गातला अडथला दूर
यानंतर कर्णधार जो रुट आणि डेव्हीड मलानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जो रुट या सीरिजच्या सुरुवातीपासून टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होता. मात्र उमेश यादवने टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर केली. उमेशने टीम इंडियाला निर्णायक क्षणी महत्वाची विकेट मिळवून दिली. उमेशने जो रुटला 21 धावांवर बोल्ड केलं. दरम्यान इंग्लंडने पहिल्या दिवसखेर 17 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 53 धावा केल्या आहेत. यामुळे इंग्लंड अजून 138 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे.