मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या 4 सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेच्या पहिल्या कसोटीत 227 धावांनी पराभव पत्करल्यानंतर दुसर्‍या कसोटीत इंग्लंडला 317 धावांनी हरवून भारताने शानदार पुनरागमन केले. वरिष्ठ वेगवान गोलंदाज उमेश यादव शेवटच्या दोन कसोटी सामन्यात संघात परतला.


इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये उमेश यादव भारतीय संघात परतला आहे. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये उमेश शार्दुल ठाकूरची जागा घेईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत उमेश जखमी झाला होता. या कसोटी सामन्याआधी उमेश तंदुरुस्त आहे की नाही याची चाचणी करण्यात येईल त्यानंतरच तो कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल. 






शार्दुल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफिसाठी खेळणार आहे. भारतविरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात कोणकोण असेल याची नावं जाहीर करण्यात आली आहेत. विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेट कीपर) ऋद्धिमान साहा (विकेट कीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज खेळणार आहेत.


 


मोटेरा मैदानात होणार शेवटचे दोन सामने
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचे शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील. प्रेक्षकांच्या क्षमतेच्या दृष्टीने हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. हे स्टेडियममध्ये एकावेळी 1 लाख 10 हजार नागरिकांना बसून सामना पाहता येतो. या सामन्यात बीसीसीआयने 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उतरण्याची परवानगी दिली आहे. तर तिसर्‍या सामन्यात 50,000 हून अधिक लोक या स्टेडियममध्ये उपस्थित राहतील. भारत इंग्लंड दरम्यान तिसरा सामना डे नाईट असेल. हा सामना गुलाबी बॉलने खेळला जाईल.


टी-20 आंतरराष्ट्रीय सीरीज शेड्युल
पहिला टी-20 सामना 12 मार्च - अहमदाबाद
दुसरा टी-20 सामना 14 मार्च : अहमदाबाद
तिसरा टी-20 सामना 16 मार्च : अहमदाबाद
चौथा टी-20 सामना 18 मार्च: अहमदाबाद
पाचवा टी-20 सामना 20 मार्च : अहमदाबाद