India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच शुक्रवारी 18 ऑगस्ट 2023 होत आहे. भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेमध्ये भारतीय संघातून अनेक नवीन चेहरे पहिल्यांदाच मैदानात खेळताना दिसतील. या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. 


नव्या खेळाडूंना संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेसाठी भारताच्या जवळजवळ सर्वच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह सुद्धा दीड वर्षानंतर मैदानावर पुनरागमन करत असून तो थेट संघाचं नेतृत्व करणार असल्याने यासंदर्भातही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. संघामध्ये यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, शाहबाद अहमद, शिवम दुबे आणि जितेश शर्मा हे तरुण खेळाडू आहेत. नव्या खेळाडूंना संधी देऊन आगामी आशिया चषक आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संघ बांधणीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. जरी ही मालिका टी-20 फॉरमॅटमधील असली तर यामधून नक्कीच नवीन खेळाडूंना मुख्य संघात स्थान मिळण्याची दारं उघडणार आहेत.


कुठे पाहता येईतील हे सामने?


3 सामन्यांच्या मालिकेच्या सामन्यांचे प्रसारणाचे हक्क वायकॉम-18 कडे आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय संघाच्या टी-20 मालिकेतील सामने स्पोर्ट्स 18 वाहिनीवर लाइव्ह दाखवले जाणार आहे. तसेच या मालिकेचे सामने फॅनकोड आणि जीओ सिनेमावरही पाहता येणार आहेत.


भारतीय संघ -


जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.


आयर्लंडचा संघ -


पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अॅड्रयू बालबिर्नी, मार्क अडायर, रॉस अडैर, कर्टिस कैंफर, गेरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हैंड, जोसुआ लिटिल, बैरी मैक्कार्थी, हैरी टेक्टर, लॉर्केन टकर, थेओ वन वोइरकॉम, बेन वाइट आणि क्रैग यंग.


भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेतील सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार


18 ऑगस्ट- पहला टी-20 सामना डबलिनमध्ये खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजल्यापासून लाइव्ह पाहता येईल.


20 ऑगस्ट- दुसरा टी-20 सामना डबलिनमध्ये खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजल्यापासून लाइव्ह पाहता येईल.


23 ऑगस्ट- तिसरा टी-20 सामना डबलिनमध्ये खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजल्यापासून लाइव्ह पाहता येईल.