मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट फार भयंकर परिस्थिती घेऊन आली. बायो बबलमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानं खेळाडूंना त्याचा धोका पोहोचू लागला. 4 खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर IPL2021 चे उर्वरित 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सामने कुठे खेळवले जाणार आणि शेड्युल कसं असेल यावर अनेक चर्चा देखील सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आणि टी 20 वर्ल्डकप सामन्यांपूर्वी IPLचे उर्वरित सामने शेड्युल केले जाणार आहेत. या सामन्यांचे नियेजन करण्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज लवकर संपवण्याबाबत इंग्लंड बोर्डशी BCCIची चर्चा सुरू आहे. 


सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये IPL2021च्या उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. IPLच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये होणारी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी 20 सीरिज रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


कपिल देव यांना ''भरपेट जेवण'' नाकारलं, पण त्यांनी नंतर दाखवून दिलं, ही माझी त्यावेळची गरज होती...


सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी 20 सीरिज खेळवली जाणार होती. मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन करण्याबाबत BCCIचं प्लॅनिंग सुरू आहे. 


बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2021 ची फायनल 10 ऑक्टोबरला खेळली जाऊ शकते. सामने लवकर संपवण्यासाठी एका दिवसात 2 सामने खेळवले जावू शकतात. कोरोना संसर्गामुळे 2020 मध्ये युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युएईमध्ये याचे आयोजन होऊ शकते.


अशीष नेहराच्या लग्नाची अजब गोष्ट! 7 दिवसांत अटोपलेल्या लग्नाची कहाणी


भारतात खेळवली गेलेली आयपीएल पुढे ढकलण्यात आल्याने आता यावर पर्याय शोधला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांचे क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल फ्रँचायझी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. असे म्हटले जात आहे की, युएई हे इंग्लंडपेक्षा स्वस्त आहे.