मुंबई: मनमिळावू आणि सर्वात मस्तीखोर खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या आशीष नेहराच्या लग्नाचा किस्सा फारच रंजक आहे. 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्याने एका आठवड्यात झटपट लग्न उरकलं त्याच्या या लग्नाची कहाणी त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितली आहे.
आशीष नेहराचं लग्न 2 एप्रिल 2009मध्ये गुजराती तरुणी रुश्मासोबत झालं आहे. त्यांनी एकमेकांनी 7 वर्ष डेट केलं होतं. रुश्मा इंग्लंड दौऱ्यादरम्यान 2002 मध्ये पहिल्यांदा त्याला भेटली होती. ती ओवल ग्राउंड क्रिकेट पाहण्यासाठी आली होती. तिथे पहिली ओळख झाली. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं त्यांनी 7 वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्न केलं.
'आशीष नेहरा म्हणाला होती की, खरं तर मला लग्न 1 एप्रिललाच करायचं होतं पण लोकांना एप्रिल फूल वाटला असता. 23 मार्चला सगळ्या मित्र गप्पा मारत बसलेले असताना तिथे आम्ही लग्नाचा प्लॅन तयार केला.'
'मित्रांना लग्नाची तारीख विचारली मी त्यांना म्हटलं 1 एप्रिल तर ते म्हणाले एप्रिल फूल वाटेल तर मग मी म्हटलं 2 एप्रिल. त्यांना वाटलं पुढच्या वर्षी करणार म्हणजे लग्नासाठी 1 वर्ष 7 दिवस बाकी आहेत. तर मी त्यांना सांगितलं नाही आता येणाऱ्या 2 एप्रिलला लग्न करायचं.'
'24 मार्च रोजी मी सगळा प्लॅन रुश्माला सांगितला. ती 26 मार्चला आपल्या आईसोबत दिल्लाला पोहोचली. त्यानंतर 28-29 मार्चला बोलणी झाली. 30 मार्चला कार्यक्रम झाला आणि 2 एप्रिलला लग्न झाला. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आजही माझे तेवढेच लाड रुश्माच्या माहेरी होतात.' लग्नाच्या कहाणीसोबत असंही सांगायला आशीष नेहरा विसरला नाही.