IND vs SL : पाकिस्तानला फोडलं आता लंका`दहनाची बारी; पाहा कसा असेल संघ?
IND vs SL, Asia Cup 2023 : टीम इंडियाकडून स्वत: कॅप्टन रोहित शर्मा फेवरेट असेल. श्रीलंकेविरुद्ध नेहमी रोहितची बॅट तळपली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
India vs Sri lanka : आयसीसी वनडे रँकिंगच्या पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला हरवल्याचा उत्सव संपला नाही, तोवर आता टीम इंडियाला लंकादहन करावं लागणार आहे. आशिया कपच्या सुपर फोरमधील चौथा सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. राजधानी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. अशातच आता श्रीलंकेला धुळ चारून टीम इंडियाने फायनलमध्ये (Asia Cup Final) एन्ट्री मारण्यासाठी तयार असल्याचं पहायला मिळतंय. त्यासाठी आता रोहित आणि विराट यांनी कंबर कसली आहे.
सामन्यासाठी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दासून शनाका श्रीलंकेचं तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर टीम इंडियाकडून स्वत: कॅप्टन रोहित शर्मा फेवरेट असेल. श्रीलंकेविरुद्ध नेहमी रोहितची बॅट तळपली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. टीम इंडिया सलग तीन दिवस सामना खेळत असल्याने आता सर्वांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेने आशिया कपमध्ये खूप चांगली कामगिरी केलीये. श्रीलंकेच्या संघात हसरंगा, चमीरा, मदुशंका, कुमारा, परेरा उपलब्ध नाही, तरी देखील श्रीलंका मैदानात चिवट झुंज देताना दिसत आहे.
हेड टू हेड (Head to Head)
भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 165 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 96 सामने जिंकले तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले. 11 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला.
पावसाची काय परिस्थिती?
दोन दिवसांच्या सततच्या पावसानंतर आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना देखील पावसाने धुतला जाण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात 84 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पिच रिपोर्ट
पावसामुळे आउटफिल्ड संथ आहे, त्यामुळे आजचा सामना लो-स्कोअरिंग होऊ शकतो. स्टेडियमच्या खेळपट्टीचा जास्तीत जास्त फायदा फिरकीपटू घेतात. भारत-पाक सामना झाला, त्याच पिचवर आजचा सामना होणार असल्याने टीम इंडियाला त्याचा फायदा मिळू शकतो.
आणखी वाचा - याला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो'
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (WK), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
श्रीलंकेचा संघ : दसुन शनाका (C), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलाल्गे, महीश तीक्षणा, मथीश पथिराना, कसुन रजिथा.