याला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो'

Wasim Akram On Virat Kohli : पाकिस्तान असो वा भारत, दोन्ही देशांच्या खेळाडूंमधील प्रेम हे आता ऑनस्क्रीन पहायला मिळतं. अशातच आता पाकिस्तानच्या माजी स्टार गोलंदाज वसिम अक्रम यांनी मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Sep 12, 2023, 08:15 AM IST
याला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो' title=

PAK vs IND, Virat Kohli : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात जेवढी कटुता आहे, तेवढीच त्यांच्या आपुलकी सुद्धा. मैदानात जेवढं वातावरण गरम तेवढंच प्रेम खेळाडूंना मैदानाबाहेर मिळतं. भारत-पाक खेळाडूंच्या मैत्रीबद्दल अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. 2019 नंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंमधील प्रेम हे आता ऑनस्क्रीन पहायला मिळतं. अशातच आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'रिझर्व्ह डे'चा सामना सुरू होणार होता. त्याआधी वसिम अक्रम (Wasim Akram) समालोचन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी विराटसोबतच्या (Virat Kohli) भेटीत नेमकं काय झालं? यावर वक्तव्य केलंय.

मला स्वप्नातही कोहलीच दिसतो...

आज मी जेव्हा सामना पाहण्यासाठी येत होतो, तेव्हा मला वाटेत विराट कोहली दिसला. आम्ही भेट घेतली. तो माझ्याशी खूप आपुलकीने वागला. बोलत असताना मी त्याला म्हणालो की,  आता माझ्या स्वप्नांमध्ये मला दिसतोस. त्यावर त्याला हसू आवरलं नाही, तो म्हणाला 'काय वसिम भाई?' त्यावर मी त्याला स्पष्टीकरण दिलं. आजकाल मी तुला इतक्या वेळा टीव्हीवर बघतो. मला तुला माझ्या डोक्यातून बाहेर काढताच येत नाही, असं त्याला म्हटल्यावर त्याने मान डोलवली, असा किस्सा वसिम अक्रम सांगतात.

वसिम अक्रम यांनी यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंचं कौतुक केलं. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी मोठे मॅचविनर खेळाडू आहेत. तर टीम इंडियाकडे विराट कोहली आणि बुमराह सारखे खेळाडू आहेत, जे तुम्हाला कोणत्याही परिस्थिती विजय मिळवून देतील. असे खेळाडू तयार होण्यासाठी वेळ लागतो. आपण त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, असं मत वसिम अक्रम यांनी व्यक्त केलं आहे. भारत-पाक सामने म्हणजे आर या पार असतात.

आणखी वाचा - PAK vs IND : विराटनं धुतलं, कुपदीपने लोळवलं... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 228 धावांनी ऐतिहासिक विजय!

दरम्यान, आशिया कपच्या सुपर फोरमधील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 228 धावांनी धुव्वा उडवला. दोन्ही संघाच्या इतिहासातील हा सर्वात मोठी विजय होता. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ ट्रोल होताना दिसत आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांच्यासारखे खेळाडू असताना देखील पाकिस्तान संघाला 150 देखील करता आले नाहीत. विराट कोहली अन् केएल राहुल यांनी ज्या अंदाजात फलंदाजी केली, त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांच्या मनात धास्ती निर्माण झाली. या प्रेशर कंडिशनमध्ये पाकिस्तानचे फलंदाज एकामागोमाग गारद झाले. याशिवाय भारतीय गोलंदाजांनी पकडलेला अचूक टप्पा पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीचा ठरला. कुलदीपच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाज थय्या थय्या नाचले. त्यामुळे आता टीम इंडियाने पॉईंट्स टेबलमध्ये मजबूत आघाडी घेतली आहे.