IND vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नका; Team India मोठ्या फरकाने सामना जिंकली नाही, तर...
IND vs ZIM: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 फेरीच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेसोबत रंगणार आहे.
India vs Zimbabwe, T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेसोबत ( Performance of Indian Team in T20 Matches ) मेलबर्न क्रिकेट ( T20 Match Records on MCG ) ग्राउंडवर होणार आहे. ओपनर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेवर मात करावी लागणार आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे सामना रद्द झाला तरीही टीम इंडिया पात्र ठरेल.
प्रत्येक संघाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जणार हे निश्चित नाही, अशी ग्रुप टूची स्थिती असताना भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. उपांत्यफेरीमध्ये आप स्थान निश्चित करण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननेच गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीसाठीचे आपले आव्हान कायम ठेवले आहे.
वाचा : IPS अधिकाऱ्याविरोधात MS Dhoni ची याचिका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मेलबर्नमध्ये रविवारी आमने- सामने
T20 विश्वचषकाच्या (t20 world cup 2022 ) पुढील सामन्यात भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. रविवार, 6 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) हा सामना खेळवला जाईल. टीम इंडियासाठी (team India) हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघ जिंकल्यास थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. पाऊस किंवा खराब हवामानामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा स्थितीत भारताचे 7 गुण होतील आणि संघ पुढील फेरीत म्हणजेच उपांत्य फेरीत पोहोचेल. झिम्बाब्वे (Zimbabwe) जिंकल्यास भारताला बाद होण्याचा धोका आहे.
T20 विश्वचषकात प्रथमच आमनेसामने
T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या छोट्या फॉरमॅटमध्ये हे दोन संघ सात वेळा भिडले असले तरी शेवटचा सामना हरारे येथे 2017 मध्ये झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघ तीन धावांनी विजयी झाला होता. आतापर्यंत झालेल्या सात टी-20 सामन्यांपैकी भारताने पाच जिंकले आहेत तर झिम्बाब्वेने दोन वेळा विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे सर्व सामने खेळले गेले आहेत. झिम्बाब्वेचा संघ प्रथमच इतर कोणत्याही मैदानावर भारताचा सामना करणार आहे.
वाचा : हीच ती वेळ! श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उपकाराची परतफेड करणार का? जाणून घ्या सेमीफायनचं गणित
धोनीनेही पराभव स्वीकारला आहे
अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अनेक प्रसंगी विजय मिळवला आहे. पण एकदा नाबाद राहूनही टीम इंडियाने झिम्बाब्वेकडून टी-20 सामना गमावला. हरारे येथे 18 जून 2016 रोजी झालेल्या सामन्यात एल्टन चिगंबुराच्या (54*) नाबाद अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने 6 बाद 170 धावा केल्या होत्या. भारतीय संघ 6 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा करू शकला. धोनीने 17 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 19 धावा केल्या आणि नाबाद परतला पण भारताचा पराभव झाला. चिगंबुराला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.