MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएस अधिकारी संपत कुमार (IPS officer Sampath Kumar) यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोनीने आयपीएस अधिकारी कुमार यांच्यावर वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी (match fixing and betting) संबंधित असून न्यायालयाने ही सुनावणी मान्य केली आहे. त्याची सुनावणी मंगळवारपासून होणार आहे.
खरे तर स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी (spot fixing and betting) संबंधित प्रकरण आयपीएल 2013 मध्ये समोर आले होते. संपत कुमार या खटल्याचे नेतृत्व करत होते. याप्रकरणी त्याने महेंद्रसिंग धोनीवरही (MS Dhoni) भाष्य केले. यावर धोनी म्हणाला होता की, आयपीएस अधिकारी संपत कुमार माझ्यावर स्पॉट फिक्सिंग करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याविरोधात खोट्या बातम्या आणि खोटी वक्तव्ये करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यासाठी धोनीने कोर्टाकडे 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली होती.
वाचा : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...
2014 मध्ये न्यायालयाने संपत कुमारला धोनीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास मनाई केली होती. मात्र असे असतानाही कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आघाडीचे वकील यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती. मंगळवारपासून या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी होणार आहे.
महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनी आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.