कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला आहे. पण वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ११० रनचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनचाही घाम निघाला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही ओपनर रोहित शर्मा(६ रन) आणि शिखर धवन (३ रन) स्वस्तात माघारी परतले. एकावेळी भारताची अवस्था ४५-४ आणि ८३-५ अशी होती. पण दिनेश कार्तिकनं आधी मनिष पांडे आणि मग कृणाल पांड्याच्या मदतीनं भारताला विजय मिळवून दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक ३१ रनवर नाबाद आणि आपली पहिलीच मॅच खेळणारा कृणाल पांड्या ९ बॉलमध्ये २१ रनवर नाबाद राहिला. मनिष पांडेनं १९ रन आणि लोकेश राहुलनं १६ रन केले. ऋषभ पंत एक रन करून आऊट झाला. वेस्ट इंडिजकडून ओशाने थॉमसनं २ आणि कार्लोस ब्रॅथवेटनं २ विकेट घेतल्या. खेरी पिरेला एक विकेट घेण्यात यश आलं.


या मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.  भारतीय बॉलरच्या अचूक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून फक्त १०९ रनच करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि खलील अहमदला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहलाही १ विकेट घेण्यात यश मिळालं. वेस्ट इंडिजकडून फॅबियन ऍलननं २० बॉलमध्ये सर्वाधिक २७ रन केले.