तुरुंगात जाण हे अनेकांसाठी एक वाईट स्वप्नच असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना विविध कारणांमुळे तुरुंगवास झाला होता. मात्र आज भारताच्या अशा क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना तुरुंगवास झाला होता. या लिस्टमध्ये श्रीसंत आणि नवजोत सिंह सिद्दू सारख्या प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश आहे. 


एस. श्रीसंत : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


16 मे 2013 रोजी दिल्ली पोलिसांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला अटक केली होती. श्रीसंतवर आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा आरोप लागला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे त्यावेळी एस. श्रीसंतने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप स्विकारले होते. आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीसंतला दोषी धरलं होतं. त्याच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. श्रीसंतवर भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि क्रिकेट खेळावर काळा डाग लावल्याचा आरोप होता. बीसीसीआयने लावलेल्या या बंदीच्या कारवाईला श्रीसंतने आव्हान दिले होते. 


नवजोत सिंह सिद्धू :  



भारताचे माजी सलामीवीर फलंदाज नवजोत सिंह सिद्धूकडून 1988 मध्ये पटियालामध्ये एक अपघात झाला. जिथे त्यांचा एका व्यक्तीशी वाद झाला. नवजोत सिंह सिद्धू यांनी रागाच्या भरात त्याव्यक्तीला खूप मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.  या घटनेनंतर नवजोत सिंह सिद्धूवर हत्येचा आरोप लावण्यात आला. यासाठी सिद्धूला 10 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा झाला होता. 1 एप्रिल 2023 रोजी सिद्धू पटियाला तुरुंगातून बाहेर आले. 


विनोद कांबळी : 



माजी क्रिकेटर विनोद कांबळीला 2022 मध्ये एका प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ते जामिनावर बाहेर पडले. काम्बळीने मुंबई येथील त्याच्या सोसायटीच्या गेटवर कार ठोकली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.  


'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सना सुद्धा झाली होती जेल : 


इंग्लंडचा प्रसिद्ध क्रिकेटर बेन स्टोक्सला नाईट क्लबबाहेर भांडण केल्या प्रकरणी तुरुंगवास झाला होता. श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुनाथिलकाला याला बलात्काराच्या आरोपाखाली १० दिवसांचा तुरुंगवास झाला होता. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि पंतप्रधान इम्रान खान याला ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बांगलादेशचा क्रिकेटर रूबेन हुसेन याला सुद्धा बलात्कार प्रकरणी २०१५ मध्ये तुरुंगवास झाला होता.