नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियचे ओपनर डेविड वॉर्नर आणि फिंच यांनी जबरदस्त बॅटिंग करत मोठा स्कोर उभा केला. या स्कोरचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाचा २१ रन्सने पराभव झाला.


ऑस्ट्रेलिया मोठा स्कोर उभारत असताना धोनीने अक्षर पटेलवर आपला राग व्यक्त केला. मोहम्मद शमीने टाकलेल्या ओव्हरमध्ये ट्रेविस हेडच्या गुडघ्याला बॉल लागला. त्यानंतर तो बॉल थर्डमॅनच्या दिशेने गेला. त्यामुळे बॅट्समनने जोरात धावत दोन रन्स काढले.



थर्डमॅन असलेल्या अक्षर पटेलने बॉल पकडण्यासाठी हळू आल्याने धोनी खूप नाराज झाला. त्यानंतर धोनी अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं. धोनीसोबतच विराट कोहलीही प्रचंड भडकला होता.


अक्षर पटेलकडे धोनी रागाने पाहत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.