INDvsAUS LIVE : भारतासमोर २३१ रन्सचं टार्गेट
नाणेफेक जिंकत भारताचा क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम 230 रन्सवर आटोपली. स्टेनलेकच्या रुपात ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट उडाली. त्याला मोहम्मद शमीनं बोल्ड केलं. यावेळी, स्टेनलेकला भोपळाही फोडता आला नव्हता. ऑस्ट्रेलिया : 230/10 (48.4 ओव्हर्स)
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जास्त म्हणजेच ५८ रन्स काढण्यात हॅन्डकॉम्ब यशस्वी ठरला तर भारताकडून युजवेंद्र चहलनं एकट्यानं सहा विकेट घेतल्या.
LIVE UPDATE : भारताची तिसरी विकेट, विराट कोहली 46 धावा करुन बाद भारत : 113\3 (29.6 ओव्हर)
भारताची दुसरी विकेट, शिखर धवन 23 धावा करुन बाद
भारताची पहिली विकेट, रोहित शर्मा 9 धावा करुन बाद
अशा उडाल्या ऑस्ट्रेलियाच्या विकेटस्...
1-8 एलेक्स कॅरी (2.5 ओव्हर्स)
2-27 ऍरॉन फिंच (8.6 ओव्हर्स)
3-100 शॉन मार्श (23.1 ओव्हर्स)
4-101 उस्मान ख्वाजा (23.4 ओव्हर्स)
5-123 मार्कस स्टोइनिस (29.3 ओव्हर्स)
6-161 ग्लॅन मॅक्सवेल (34.5 ओव्हर्स)
7-206 झा रिचर्डसन (43.3 ओव्हर्स)
8-219 पीटर हॅन्डसकॉम्ब (45.6 ओव्हर्स)
9-228 एडम जाम्पा (47.4 ओव्हर्स)
10-230 बिली स्टॅनलेक (48.4 ओव्हर्स)
अधिक वाचा :- ऑस्ट्रेलिया 230 धावांवर ऑलआऊट, भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान
मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आतापर्यंत 14 सामने झाले असून यातील पाच वेळाच भारत जिंकू शकलाय. ऑस्ट्रेलियन भूमीमध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारत आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. गेल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.
अडथळ्यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला झटका 8 धावसंख्या असताना भुवनेश्वरने अॅलेक्स कॅरीला कोहली च्या हाती झेलबाद केले. अॅलेक्स कॅरी 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा सोबत अरॉन फिंचने डाव सांभळण्याचा प्रयत्नात असताना भवनेश्वरने त्यांचे मनसुबे अपयशी ठरवले. भुवनेश्वरने अरॉन फिंचला 14 धावांवर पायचीत केले. यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शॉन मार्शने उस्मान ख्वाजा सोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली.
गेल्या सामन्यात शतकी कामगिरी केलेल्या शॉन मार्शला या सामन्यात मोठी पारी करता आली नाही. त्याला धोनीने चहलच्या गोलंदाजीवर 39 धावांवर खेळत असताना यष्टीचीत केले. यानंतर आलेल्या पीटर हॅन्डसकॉम्बने उस्मान ख्वाजासोबत खेळीला सुरुवात केली. शॉन मार्शच्या पाठोपाठ उस्मान ख्वाजा देखील बाद झाला. चहलने त्याला स्वतच्या गोलंदीजीवर झेलबाद केले. ख्वाजा 34 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या मार्कस स्टोइनिस सोबत पीटर हॅन्डसकॉम्ब खेळत आहेत. यांच्या मध्ये पाचव्या विकेटसाठी 22 धावा जोडता आल्या. मार्कस स्टोइनिस 10 धावा करुन बाद झाला. त्याला चहालने रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले.
अशा आहेत टीम्स :
भारत : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उप-कॅप्टन), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), विजय शंकर, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅन्डसकॉम्ब, ग्लॅन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिशेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), झाए रिचर्डसन, बिली स्टॅनलेक, पीटर सिडल आणि एडम जाम्पा