चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावर तिकीट विक्री सोमवारपासून, जाणून घ्या किंमत
दोन वर्षांनंतर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये परतणारी टीम चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरु होणार आहे.
चेन्नई : दोन वर्षांनंतर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये परतणारी टीम चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरु होणार आहे. एमए. चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणाऱ्या सामन्याची तिकीट २ एप्रिलपासून सकाळी ९.३० वाजता सर्व ठिकाणी मिळेल. ऑनलाईन तिकीट बुक माय शो या संकेतस्थळावर सामन्याचे तिकीट उपलब्ध असेल.
चेन्नई आपला पहिला सामना घरच्या मैदानावर १० एप्रिल रोजी कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर २०, २८, ३० एप्रिल असे पाच तर १३ आणि २० मे रोजी आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. चेन्नई टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले, आयपीएलच्या या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पाठिराख्यांना बुक माय शोच्या माध्यमातून तिकीट खरेदी करता येणार आहे.
आयपीएलच्या ११ व्या सीझनची सुरुवात ७ एप्रिलपासून होत आहे. पहिला सामना मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात होणार आहे. कमीत कमी १३०० रुपये तिकीट दर आहे. सकाळी ९.३० ते १२.३० वाजता दुपारी आणि दुपारी २ ते ६ वाजता तिकीट खेरदी करता येणार आहे. प्रीमियम तिकीट ५००० आणि ६५०० रुपये दरम्यान असणार आहे. एक व्यक्ती काऊंटरवर दोन पेक्षा जास्त तिकीट खरेदी करु शकत नाही. तिकीट ऑनलाईनही खरेदी करु शकता. chennaisupreking.com आणि bookmyshow.com या संकेतस्थळावर तिकीट बुकिंग करु शकता.
५१ दिवसांपर्यंत आयपीएलच्या ११ व्या सीझनमधील सामने सुरु राहणार आहेत. एकूण ४८ सामने रात्री होणार आहेत. १२ सामने ४ वाजता सुरु होतील तर ४८ सामने रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत.