IPL 2021 CSK vs RCB : पराभवानंतर कोहली सर जडेजावर फिदा... नक्की असं काय घडलं?
सर जडेजाच्या तुफान खेळीवर किंग कोहली का झाला खुश?
मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरूच्या विजयी रथाला ब्रेक लागला आणि मोठा फरकानं कोहलीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सलग चार विजय मिळवल्यानंतर हा सर्वात मोठा पराभव चेन्नईकडून झाला. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये रवींद्र जडेजानं मैदानात तुफान आणलं आणि सामन्याचं रूपच बदलून गेलं.
एकीकडे संघाचा पराभव झाल्यानं विराट कोहली मैदानात निराश वाटला असला तरी हा पराभव त्याने सकारात्मक पद्धतीनं घेतल्याचं पाहायला मिळालं. कोहलीनं सामन्यानंतर याबाबत बोलतानाही सांगितलं की एका व्यक्तीमुळे मॅच फिरली.
या सामन्यातून राहिलेल्या उणीवा आम्ही भरून काढूच आणि हर्षल पटेलनंही चांगली गोलंदाजी केली. एका सामन्यात पराभव आला म्हणून काय झालं आम्हाला कुठे कमी पडतोय ते समजलं.अधिक तयारीनं आम्ही पुढच्या सामन्यासाठी उतरू असंही कोहली यावेळी म्हणाला.
सर जेडजाबद्दल किंग विराट कोहली काय म्हणाला ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
संघाचा पराभव झाला असला तरी ओव्हर ऑल किंग कोहली मात्र सर जडेजाच्या मैदानात आणलेल्या तुफान सिक्समुळे खूश आहे. कोहलीला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सर जडेजाला दुखापत झाली होती. पुन्हा एकदा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये त्याने केलेल्या कामगिरीचा फायदा हा केवळ चेन्नईलाच नाही तर यापुढे IPL संपल्यानंतर टीम इंडियालाही होणार आहे. त्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी फायदाचा असणार आहे.
IPL संपल्यानंतर टीम इंडिया वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध भारत अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जडेजा फूल फॉर्ममध्ये आल्यानं विराट कोहली खूश झाला आहे.