मुंबई: चेन्नई विरुद्ध आज राजस्थान रॉयल्स सामना वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. युवा कर्णधार संजू सॅमसन विरुद्ध कॅप्टन कूल आमने सामने येणार आहेत. चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघ प्रत्येक एक सामना जिंकले आहेत. आज महेंद्र सिंह धोनी संघात कोणाकोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान विरुद्धच्या सामन्यादरम्यान खेळण्यासाठी लुंगी नगीदि चेन्नई संघामध्ये समाविष्ट झाला आहे. तो क्वारंटाइनमध्ये असल्यानं आधीचे दोन सामने खेळू शकला नाही. आता महेंद्र सिंह धोनी त्याला संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटच्या सामन्यातील संघ पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. शेवटच्या सामन्यात धोनीनं निवडलेला संघ चांगल्या पद्धतीनं खेळल्यानं त्यामध्ये विशेष बदल होणार नाही असं काही तज्ज्ञांचा दावा आहे.



दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऋतुराज गायकवाड की रॉबिन उथप्पा कोणाला संधी मिळणार? हे पाहाणं देखील आज महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत 2008 ते 2021 या कालावधीमध्ये चेन्नई विरुद्ध राजस्थान 23 सामने खेळले आहेत त्यापैकी 14 सामन्यांवर चेन्नईनं वर्चस्व मिळवलं आहे. 


चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


ऋतुराज गायकवाड/रॉबिन उथप्पा, फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर


राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


 मनन वोहरा/यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान