IPL 2021 KKR vs RR: मॉरिसच्या घातक गोलंदाजीपुढे कोलकाताचं लोटांगण, 6 विकेट्सनं राजस्थानचा विजय
संजू सॅमसनच्या टीमचा दुसरा विजय, कोलकातावर 6 विकेट्सने मात
मुंबई: आयपीएल 2021 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 6 विकेट्स राखून पराभूत केले. सामन्यात टॉस जिंकून राजस्थानने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 133 धावा केल्या. राजस्थान संघाला 134 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून कोलकाता संघावर दणदणीत विजय मिळवला.
टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना कोलकाता संघाने 20 ओव्हरमध्ये 9 बाद 133 धावा करण्यात यश आलं आहे. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 34 धावा केल्या तर दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने 25 धावा केल्या. याशिवाय नितीश राणाने 22 धावा केल्या.
कोलकाता संघाची सुरुवात चांगली झाली नाहीत. राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकाता संघाला 133 वर रोखण्यात यश मिळालं आहे. ख्रिस मॉरिसने चार विकेट्स घेतल्या आहेत. तर राजस्थान संघात जोस बटलरने 5 जयस्वालनं 22 संजूनं 42 शिवम दुबेनं 22 डेव्हिड मिलरने 24 धावा केल्या आहेत.