शारजा : शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह कोलकाताने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. कोलकाताची आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. आता कोलकाता ट्रॉफीसाठी चेन्नई विरुद्ध भिडणार आहे. (ipl 2021 qualifier 2 kkr vs dc kolkata knight riders beat delhi capitals by 3 wickets)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तर सलामीवीर शुबमन गिलने 46 रन्स चोपल्या. नितीश राणा 13 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर कोलकाताने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे सामन्यात रंगत आली. कोलतकाताचे मीडल ऑर्डरमधील 4 फलंदाज खातं न उघडता म्हणजेच शून्यावर आऊट झाले. त्यामुळे लो स्कोअरिंग सामन्याचा हायव्होलटेज थरार पाहायला मिळाला. 


मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये राहुल त्रिपाठीने सिक्स खेचून कोलकाताला विजय मिळवून दिला. त्रिपाठीने नाबाद 12 धावांची निर्णायक खेळी केली.  


दिल्लीकडून एनरिच नोर्तेजे, कगिसो रबाडा आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आवेश खानने 1 विकेट घेतला.


दिल्लीची बॅटिंग  


दरम्यान त्याआधी दिल्लीने बॅटिंग करताना निर्धारित  20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद 30 रन्स केल्या. 


इतर फलंदाजांना सुरुवात चांगली मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. धवन आणि अय्यरचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा अधिक धावांचा आकडा गाठता आला नाही.


सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मार्क्स स्टोयनिसने प्रत्येकी 18 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर 17 धावा करुन रनआऊट झाला. तर कर्णधार रिषभ पंतने 6 धावाच केल्या. तर अक्षर पटेल 4 धावांवर नाबाद राहिला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसन आणि शिवम मावीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.  


दिल्ली कॅपिटल्स Playing XI : शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) , श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिक नॉर्खिया.


कोलकाता Playing XI : शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, शिवम मावी, लोकी फर्गुसन आणि वरुण चक्रवर्ती.