यूएई : मुंबईने (MI) आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात (IPL 2021 Match 51 Result) राजस्थानवर (RR) 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने मिळवलेल्या या  विजयामुळे प्लेऑफच्या (IPL Playoff 2021) आशा कायम आहेत. राजस्थान विरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या अनेक खेळाडूंनी दणक्यात कमबॅक केलं. मुंबईचा मीडल ऑर्डरमधील फलंदाज ईशान किशनलाही (Ishan Kishan) सूर गवसला. यामुळे कॅप्टन रोहित शर्माही (Rohit Sharma) खूश आहे. ( ipl 2021 rajasthan royals vs mumbai indians captain rohit sharma give reaction on ishan kishan return to form) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच विनर ईशानचं झोकात कमबॅक
 
राजस्थान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर रोहितने प्रतिक्रिया दिली. ईशान आऊट फॉर्म असल्याने त्याला काही सामन्यातून वगळण्यात आलं. मात्र त्यानंतरही ईशानवर काहीही नकारात्मक परिणाम झाला नाही. ईशानने या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक पूर्ण केलं. ईशानने मुंबईला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. 


रोहित काय म्हणाला? 


"आम्ही इथे जे करायला आलो होतो ते केलं. आमच्यासाठी 2 पॉइंट्स महत्तवपूर्ण होते. राजस्थानला 90 धावांवर गुंडाळल्यानंतर सामना लवकर आटोपण्याची संधी आमच्याकडे होती. सामना जिंकणं बंधनकारक होतं. आम्ही बिंधास्त बॅटिंग केली. आमची सुरुवात चांगली झाली. आमच्यासाठी हा चांगला सामना राहिला ", असं रोहित म्हणाला. 


रोहित ईशानबाबत काय म्हणाला?


"ईशान काही सामन्यांनंतर खेळत होता. मी जोखीम पत्कारली. ईशानची योग्यता आम्हाला माहिती आहे. ईशानने स्वत:साठी वेळ घ्यावा, असं आम्हाला वाटत होतं, ईशाननेही तसंच केलं. जेम्स निशामच्या गोलंदाजीचाही आम्ही आनंद लुटला. जेम्स हा एक मजबूत माणूस आहे", असंही रोहितने नमूद केलं. 


"काय करायचं ते आम्हाला माहितीयं"  
 
"जेव्हा तुम्ही एखाद्या मोहिमेवर असता, तेव्हा तुम्हाला तुमचं काम जबाबदारीने पूक्ण करायचं असतं. सर्व गोलंदाजांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेत कोणताही संघ कोणत्याही टीमला पराभूत करण्याची क्षमता ठेवते. कोलकाता आमच्यासमोर खेळतायेत आणि आम्ही काय करायचंय, ते आम्हाला माहितीये", असंही रोहितने नमूद केलं.


दरम्यान प्लेऑफसाठी चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरुने धडक मारली आहे. एकूण 4 पैकी 3 जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आता शेवटच्या म्हणजेच चौथ्या क्रमांकासाठी मुंबई आणि कोलकातामध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.