मुंबई: हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 धावांनी रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने विजय मिळवला. हैदराबाद संघाची सामन्यावर पकड मजबूत होत असतानाच शेवटच्या तीन ओव्हरमध्ये बाजी पलटली आणि निकाल विराट कोहलीच्या बाजूने लागला. याचं श्रेय एका खास गोलंदाजाला जातं. या गोलंदाजानं सतराव्या ओव्हरमध्ये कमाल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच ओव्हरमध्ये बंगळुरूच्या गोलंदाजानं तीन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या आणि हैदराबादचं मनोबल खचलं. सामन्यावर असलेली पकड सुटली आणि 6 धावांनी हैदराबादचा पराभव झाला. 


26 वर्षीय शाहबाजने 2 ओव्हरमध्ये केवळ 7 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने एकाच ओव्हरमध्ये  तीन विकेट घेतल्या. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघाला हा विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. 




कर्णधार विराट कोहलीने शाहबाजला 17 वा ओव्हर दिला. शाहबाजने अपेक्षेप्रमाणेच आपल्या कर्णधाराची निराशा केली नाही. त्यानं फेकलेला ओव्हर सामन्यातील टर्निंग पॉइंट होते. शाहबाजने या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांना बाद केले. या ओव्हरमध्ये पहिल्या, दुसर्‍या आणि शेवटच्या चेंडूवर त्याने विकेट्स घेतल्या.


मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात बंगळुरू पहिला सामना जिंकला. त्यानंतर हैदराबादवर विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये बंगळुरू संघानं पहिलं स्थान मिळवलं आहे.