मुंबई: श्रेयस अय्यरच्या खांद्याची सर्जरी 8 एप्रिल रोजी झाली. त्यानंतर IPLचे सामने सुरू झाले. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली. हा खेळाडू त्यानंतर पुन्हा मैदानात उतरू शकला नाही. सध्या हा खेळाडू संपूर्ण IPL बाहेर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघातून खेळत होता. पंजाब विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कॅच पकडताना त्याच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर स्टोक्स भारतात एक आठवडा थांबला. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार स्टोक्स इंग्लंडला परतला आहे.



स्टोक्सच्या बोटावर शस्त्रक्रिया होणार असून तो 12 आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहणार आहे. स्टार खेळाडू संघातून गेल्यानं राजस्थान रॉयल्सला हा मोठा धक्का बसला. त्यानंतर स्टोक्सच्या जागी डेव्हिड मिलरची संघाच निवड करण्यात आली आहे. 


पंजाब विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघ पराभूत झाला. तर दिल्ली विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला होता. ECB बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार स्टोक्सवर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.