IPL2021 MIvsRCB: युजवेंद्र चहलच्या डोक्यावर चढल WWEचं भुत
IPL मधील आज पहिला सामना चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चेलेंजर्स बंगळुरु असा रंगणार आहे.
मुंबई: IPL 2021 चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. या हंगामात पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्याआधी RCB संघातील गोलंदाजावर WWFचं भुत चढल्याचं पाहायला मिळत आहे. त्याने आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स संघातील गोलंदाज युजवेंद्र चहलने गुरुवारी 6 फूट 8 इंच असलेल्या काइल जेमसनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो WWE रेसलर अंडरटेकर बनल्याचं दिसत आहे. युजवेंद्र चहल व्हिडिओमध्ये कुस्तीपटूप्रमाणे चालत आहे. तर त्याच्या मागे काईल जेमीसन त्याच्या मागेमागे चालताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये अंडरटेकर थीम गाणं लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमधील खेळाडूंनी देखील या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हर्षद पटेल युजवेंद्रला मोबाईल फोन आणि काइलला मोबाईल टॉवर अशी कमेंट केली आहे.