मुंबई :  दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 4 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेले आव्हान दिल्लीने 178 धावांचं आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अक्षर पटेल (Axar Patel) आणि ललित यादव (Lalit Yadav) हे दोघे दिल्लीच्या विजयाचे हिरो ठरले. (ipl 2022 dc vs mi delhi capitals beat mumbai by 4 wickets axar patel and lalit yadav played game changing innings)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

75 धावांची विजयी भागीदारी


या दोघांनी निर्णायक क्षणी दिल्ली अडचणीत असताना मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ललितने नाबाद 48 तर अक्षरने नाबाद  38 धावांची खेळी केली. दिल्लीची 13.4 ओव्हरमध्ये 6 बाद 104 अशी स्थिती झाली होती. 


मात्र यानंतर ललित आणि अक्षर या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची विजयी भागीदारी साकारली. 


या दोघांव्यतिरिक्त दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने 38  तर टीम सायफर्टने 31 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून बासिल थ्मपीने 3 विकेट्स घेतल्या.  मुर्गन अश्विनने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.  


मुंबईची बॅटिंग


दरम्यान त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. 


मुंबईकडून ओपनर ईशान किशनने सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने 41 धावा केल्या. तर पदार्पणवीर तिलक वर्माने 22 धावांचं योगदान दिलं. तर दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 


दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मंदीप सिंह, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी.