मुंबई: लखनऊ विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने धावांचा डोंगर उभा केला. मात्र तरीही 10 ते 15 धावा विजयासाठी अखेर कमी पडल्या आणि पंतची टीम पराभूत झाली. दिल्ली पराभव झाला असला तरी पंतचं कौतुक होत आहे. त्याचा उत्तम फॉर्म पाहून त्याचं कौतुक झालं. शिवाय त्याने धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळला. त्याचा हा शॉट पाहून सर्वांनाच धोनीची पुन्हा एकदा आठवण झाली. अनेकांनी गुरुची कॉपी करत असल्याचंही सोशल मीडियावर म्हटलं आहे. त्याचा हा शॉट पाहून सर्वजण हैराण झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दिल्लीच्या 19 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा आवेश खान बॉलिंग करत होता. त्यावेळी तिसरा बॉल आवेशने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. त्याच बॉलवर पंतने मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळला. त्याचा हा शॉट पाहून सर्वजण हैराण झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


पंतने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 बॉलमध्ये 39 धावा केल्या. त्याने खेळलेल्या मिनी हेलिकॉप्टर शॉटची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या. लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं. लखनऊने 155 धावा 6 गडी गमावून पूर्ण केल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. क्विटन डी कॉकने सर्वात जास्त 80 धावा केल्या.