पुणे : ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. (ipl 2022 srh vs csk chennai super kings set 203 runs target for hyederabad ruturaj gaikwad and devon conway shine)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुराज आणि डेवोन या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजचं शतक अवघ्या 1 धावेसाठी हुकलं. दुर्देवाने ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला.  ऋतुराजने 57 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 99 धावांची शानदार वादळी खेळी केली. 


तर दुसऱ्या बाजूला डेवोनने 55 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्ससह 85 धावांनी नाबाद खेळी केली. कॅप्टन महेंद्रसिंह धोनी 8 धावा करुन माघारी परतला. तर रवींद्र जाडेजा 1 धावेवर नॉट आऊट परतला. हैदराबादकडून टी नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. 


सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन आणि उमरान मलिक.


चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवोन कॉन्वे, अंबाती रायडू, सिमरजीत सिंह, रवींद्र जडेजा,  ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, मुकेश चौधरी आणि महीष तीक्ष्णा.