IPL 2023: सलग 5 षटकार ठोकणाऱ्या रिंकू सिंगसाठी Adult Star ने केलं ट्विट, म्हणाली...
IPL 2023: गुजरातविरोधातील (Gujarat Titans) सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कोलकाताच्या (Kolkata Knight Riders) रिंकू सिंगसाठी (Rinku Singh) अॅडल्ड चित्रपटातील स्टारने ट्वीट केलं आहे.
Kendra Lust on Rinku Singh: सध्या आयपीएलचा हंगाम सुरु असून यावेळी अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. गुजरात आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात तर अगदी शेवटच्या ओव्हरला सगळा खेळच पलटला आणि क्रिकेट रसिकांना एका अभुतपूर्व सामना अनुभवण्याची संधी मिळाली. या सामन्याचा खरा हिरो ठरला कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग. एका ओव्हरमध्ये 29 धावांची गरज असताना रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार लगावले आणि संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. यानंतर सगळीकडेच रिंकूच्या नावाची चर्चा आहे. यादम्यान एका अॅडल्ट चित्रपटातील स्टारने रिंकूसाठी ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून व्हायरल झाला आहे.
अॅडल्ट स्टार केंड्रा लस्टने ट्विटरला रिंकू सिंगचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एडिट करत तिने त्याच्यासह आपलाही फोटो जोडला आहे. हा फोटो ट्वीट करताना तिने 'Rinku - The King' असं लिहिलं आहे. केंड्रा लस्टने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच तुफान व्हायरल झाला होता. तसंच या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
GT vs KKR : हायव्होल्टेज सामन्यात केकेआरचा दणक्यात विजय; रिंकू सिंगने आस्मान दाखवलं!
गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात रिंकू सिंगने केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर केकेआरचा मालक शाहरुख खानसह सुहाना खान, विरेंद्र सेहवाग, इशान किशन आणि आर्यन खान असे अनेकजण कौतुक करत आहेत.
पाटणा रेल्वे स्थानकामुळे केंड्रा लस्ट आली होती चर्चेत
काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणामधील रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर केंड्रा लस्टचा अॅडल्ट व्हिडीओ लावण्यात आला होता. स्थानकावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर केंड्रा लस्टचं नावही चांगलंच चर्चेत आलं होतं आणि प्रसिद्धी मिळाली होती. केंड्रा लस्टनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली होती.
गुजरातविरोधातील सामन्यात काय झालं होतं?
गुजरातने कोलकाताला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकाताची सुरूवात चांगली झाली नव्हती. गुरबाज आणि जगदिशन झटपट बाद झाले होते. त्यानंतर व्यंकटेश अय्यर याने वादळी खेळी केली होती. नितीश राणानेही अय्यरला चांगली साथ दिली होती. नितीश राणा 45 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर अय्यरने 8 चौकार आणि 5 षटकार मारत 83 धावांची वादळी खेळी केली होती.
यानंतर मैदानात रिंकू सिंग उतरला होता. दरम्यान, अखेरच्या ओव्हरला कोलकाताला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंग स्टाईकवर होता. या ओव्हरमध्ये त्याने पाच षटकार ठोकले आणि सामना कोलकाताच्या पारड्यात फिरवला. कोलकाताने गुजरातवर 3 विकेटने दणदणीत विजय मिळवला होता.