IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी `या` खेळाडूला संधी
IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे.
IPL 2023: देशभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला (IPL 2023) येत्या 31 मार्चपासून सुरुवात होता आहे. तब्बल 52 दिवस चाहत्यांना धमाकेदार क्रिकेटची मेजवाणी मिळणार असून 28 मेला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. गत विजेती गुजरात टायटन्स (GT) आणि एमएस धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यानच्या (CSK) सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दहा संघात जेतेपदासाठी चुरस रंगणार असून यंदा देशातली सर्व प्रमुख स्टेडिअमवर आयपीएलचे सामने रंगणार आहेत.
आयपीएलसाठी संघ सज्ज
आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) नव्या हंगामासाठी नवी रणनिती आखली आहे. दिल्लीचा प्रमुख खेळाडू आणि कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे (Rishabh Pant Accident). या दुखापतीतून तो अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे आयपीएल 2023 मधून तो बाहेर झालाय. ऋषभ पंतच्या जागी ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नला (David Warner) दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विकेटकीपर म्हणून आणखी एका खेळाडूची संघात वर्णीत लागण्याची शक्यता आहे.
ऋषभच्या जागी या धडाकेबाज फलंदाजाला संधी
ऋषभ पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्स संघात विकेटकिपर म्हणून सर्फराज खानला (Sarfaraz Khan) अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली संघात विकेटकीपर म्हणून फिल साल्टही आहे. पण विकेटकिपिंगसाठ सर्फराजचं नाव आघाडीवर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 1 एप्रिलला लखनऊ सुपर जाएंट्सबरोबर रंगणार आहे.
सर्फराज खान फॉर्मात
स्थानिक क्रिकेटमध्ये सर्फराज खान जबरदस्त फॉर्मात आहे. रणजी क्रिकेटमध्ये सर्फराजने सातत्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत सर्फराज मोठा दावेदार मानला जात आहे. सर्फराज आयपीएलमध्ये आतापर्यंत 46 सामने खेळला आहे. यात त्याने 24.18 च्या रनरेटने 532 धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात सर्फराज खानला केवळ 6 सामनेच खेळण्याची संधी मिळाली होती.
आईपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड वार्नर (कर्णधार), मनीष पांडे, पृथ्वी शॉ, रिली रोसो, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सर्फराज खान, यश ढुल, अमन हाकिम खान, अक्षर पटेल, ललित यादव, मिशेल मार्श, फिल साल्ट, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, इशांत शर्मा, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी नागिडी, मुकेश कुमार, मुस्तफिजुर रहमान, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल