IPL 2023 Final : यंदाच्या आयपीएलमध्ये स्पर्धेच्या मध्यापासून प्रत्येक सामन्यानं रंगत वाढवली आणि पाहता पाहता तळाशी असणाऱ्या संघांनी मुसंडी मारून वरचं स्थान मिळवलं. चेन्नई आणि गुजरातच्या संघांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. पण, ठरलेल्या वेळेत सामना काही होऊ शकला नाही. कारण, Chennai Super King आणि Gujarat Titans या दोन्ही संघांच्या विजेतेपदापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात पावसानं असा काही व्यत्यय आणला की हजारोंच्या संख्येनं मैदानात उपस्थित राहिलेल्या क्रिकेटप्रेमींचाही हिरमोड झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे हा सामना एक दिवस पुढे ढकलला खरा, पण त्या दिवशी म्हणजेच 29 मे 2023 रोजीही पावसानं हजेरी लावली, तर या सामन्याचं काय होणार? विजेतेपद कोणाला मिळणार ? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करत आहेत. किमान सध्यापर्यंततरी हवामान विभागाकडून अहमदाबाद येथील Narendra Modi Stadium आणि नजीकच्या भागावर पावसाचे ढग नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, त्यानं आडकाठी घातलीच तर नेमकं काय होईल याबाबतच्या काही शक्यता खालीलप्रमाणे... 


- डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं सामना खेळवण्याचा निर्णय घेऊनही तो खेळला गेला नाही. तरी सामन्याचं जेतेपद गुजरात टायटन्सच्या संघाला मिळेल. 


- सामना सुरु होऊन पहिल्या खेळीनंतर दुसरी खेळी सुरु होताच पाच षटकांनंतर पाऊस आल्यास Duckworth-Lewis नियम लागू होईल. 


- पहिल्या खेळीनंतर दुसऱ्या खेळीच पावसानं थैमान घातलं, तरीही गुजरातच्या संघालाच जेतेपद मिळेल. 


- पहिल्या खेळीच्या दरम्यान पावसानं हजेरी लावली आणि तो बराच वेळ सुरुच राहिला तर षटकांची संख्या कमी करण्यात येईल. जेणेकरून दोन्ही संघांना फलंदाजीची संधी मिळेल. 


सामना एक शक्यता अनेक... 


- रविवारप्रमाणं सोमवारीही पावसामुळं सामन्याला उशिर झाल्यास, 9.40 त्या आधी तो सुरु झाल्यास षटकं कमी केली जाणार नाहीत. 


- सामन्याच्या वेळा बदलल्यास संभाव्य वेळा आणि षटकांचं गणित : रात्री 9.45 वाजता - 19 षटकं, 10 वाजता - 17 षटकं, रात्री 10.30 वाजता - 15 षटकं 


- 12.06 AM हा cutoff time असून, याचा अर्थ या हीच ती शेवटची वेळ जेव्हा पाच षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. 


हेसुद्धा पाहा : IPL 2023 : अखेरच्या सामन्याआधी माहीच्या नशिबी हा कसला अजब योगायोग? पाहून तुम्हीही विचारात पडाल 


- वरील कोणतीही शक्यता वापरात येणारी नसेल तर सामना super over मध्ये जाईल. पण, त्यासाठी आऊटफिल्ड आणि खेळपट्टी 1.20 AM पर्यंत तयार असणं अपेक्षित आहे. 


- सुपर ओव्हरही झाली नाही, तर यंदाच्या आयपीएलचं जेतेपद गुजरातच्या खात्यात जाणार आहे. गुणतालिकेत हा संघ चेन्नईच्याही वर असल्यामुळं ते जेतेपदाचे मानकरी ठरतील.