GT vs LSG मध्ये आज दिसणार पांड्या बंधुंचा स्वॅग, पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2023, GT vs LSG : आयपीएलचा 51 व्या सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून दोन्ही भावांमध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
GT vs LSG Dream11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 51 वा सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (GT vs LSG) यांच्यात रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून आज, (7 मे 2023) दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. आजच्या सामन्यात विशेष म्हणजे हार्दिक आणि कृणाल (Hardik Vs Krunal) हे सखे भाऊ आमने-सामने येणार आहेत. कारण गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलच्या (K L rahul) आयपीएल 2023 मधून बाहेर पडल्यानंतर कृणाल पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. आजच्या सामन्यात पांड्या ब्रदर्स एकमेकांच्या विरोधात असतील. दोन्ही संघ गुणतालिकेच्या टॉप 4 मधून असून गुजरातचा संघ 14 गुणांसह अव्वल स्थानी असून लखनऊचा संघ 11 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (GT vs LSG) तीनदा आमनेसामने आले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये गुजरातच्या संघाचा लखनऊच्या संघाने पराभव केला. त्यामुळे गुजरातविरुद्ध पहिल्या विजयाच्या शोधात लखनऊ संघ मैदानात उतरणार आहे.
गुजरातचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर
गुजरात टायटन्स 10 पैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. उर्वरित तीन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. सहापैकी कोणत्या तीन महासंघांना प्लेऑफचे तिकीट मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा : दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार? वाचा महत्त्वाची बातमी
लखनऊ सुपर जायंट्सचे तिसऱ्या स्थानी
तर लखनऊ सुपर जायंट्सचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही तो खेळू शकणार नाही, अशी माहिती दिली. लखनऊ सुपर जायंट्स 11 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या संघांने आतापर्यंत 10 पैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यांचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे वाहून गेला होता. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयासाठी आजची लढत असणार आहे.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स : मनन वोहरा, काइल मेयर्स, आयुष बडोनी, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, मोहसिन खान, रवी बिश्नोई.