10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल?

Maharashtra Board Result 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर विद्यार्थी आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहे. याच निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली असून यावर्षी अगदी वेळेत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 7, 2023, 10:02 AM IST
10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल? title=
Maharashtra Board 10th, 12th Result 2023

Maharashtra Board 10th, 12th Result 2023: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे लवकरच हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल जाहीर करणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही. 

दहावी आणि बारावीचा परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र, ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.

बारावीची (HSC) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडली तर 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. 12वीच्या परीक्षेसाठी राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती.

निकाल कधी लागणार?

CBSE ने सध्या अधिकृत वेबसाइटची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.  तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणीचे तसेच मॉडरेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. मात्र या निकालासंदर्भात बोर्डाने या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयात एकूण 33% गुण आवश्यक आहेत. तुम्हाला कोणत्याही एका किंवा दोन विषयात तुमच्या किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाले, तर तुम्हाला कंपार्टमेंट परीक्षेत बसावे लागेल. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना दोनपेक्षा जास्त विषयात कमी गुण मिळाल्यास नापास मानले जाईल. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. 

तसेच गेल्या वर्षी 2022 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाची 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर झाली होता. तर 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ८ जून 2022 ला जाहीर झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच लिंक सक्रिय करण्यात आली. मात्र यंदा निकालाला उशीर होणार नाही. पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.