IPL 2023, Suryakumar Yadav: क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेला स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्याला संधी मिळाली होती. मात्र, त्यानंतर अय्यर आल्याने त्याला बाहेर बसावं लागलं. त्यानंतर आता आयपीएल सुरू होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलपूर्वी सूर्या मालामाल झाल्याचं पहायला मिळत आहे. (Jio Cinema has signed cricketer Suryakumar Yadav as new brand ambassador before tata ipl 2023)


सूर्यकुमार यादव Jio Cinema चा नवा Brand Ambassador


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा आयपीएलच्या (Tata IPL 2023) डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर जिओ सिनेमाने (Jio Cinema) आगामी हंगामासाठी सूर्यकुमार यादव याची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून घोषणा केली आहे. ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक निवेदन सादर केलं.


काय म्हणाला Suryakumar Yadav?


आगामी आयपीएल सीझनसाठी जिओ सिनेमाशी जोडल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. जिओ सिनेमा (Jio Cinema) जगभरातील क्रीडा चाहत्यांसाठी त्याच्या तल्लीन सादरीकरणाद्वारे डिजिटल अनुभवात क्रांती घडवत असल्याचं सूर्याने म्हटलं आहे.



12 भाषांमध्ये पाहा IPL चे सामने 


इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, क्रिकेट चाहत्यांना तामिळ, तेलगू, कन्नड आणि भोजपुरीसह 12 भारतीय भाषांमध्ये सामन्याच्या कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे. आयपीएल सामने याआधी हॉटस्टारवर पहायला मिळत होते. आता लाईव्ह स्ट्रिमिंगचे (Tata IPL Live streaming) अधिकार जिओ सिनेमाकडे असणार आहेत.


आणखी वाचा - Mumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo


सूर्याची मुंबईच्या रस्त्यावर मस्ती 


दरम्यान, सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये सूर्या मुंबईतील रस्त्यांवर तरुणांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. त्यामुळे सूर्याचं कौतूक होताना दिसत होत. आता मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना सूर्या अनेक गोलंदाजांची वाट लावेल, अशी अपेक्षा मुंबईचे चाहते करताना दिसत आहेत.