IPL 2023 playoff : आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये  (Point Table) मोठ्याप्रमाणावर उलटफेर होताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातील पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असणारे संघ आता तळाला पोहोचलेत तर तळाचे संघ थेट पहिल्या चारमध्ये दाखल झाला आहेत. स्पर्धेतील सर्व दहा संघांचे प्रत्येकी नऊ सामने खेळले गेले आहेत. त्यामुळे प्ले ऑफसाठीची चुरस जबरदस्त वाढली आहे. प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करतोय. पण सध्याची कामगिरी बघता चार संघांना प्ले ऑफसाठी प्रेक्षकांची पसंती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे पॉईंटटेबलचं चित्र
सध्या पॉईंटटेबलमध्ये हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) नऊ पैकी सहा सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स आणि एमएस धोणीची चेन्नई सुपर किंग्स 10 सामन्यात प्रत्येकी 11 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. संजू सॅमसमनची राजस्थान रॉयल्स 9 सामन्यात पाच पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पाचव्या तर मुंबई इंडिय्स सहाव्या स्थानावर आहेत. अशात प्ले ऑफसाठी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. 


गुजरात टायटन्स
गत विजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यावेळीदेखील जबरदस्त फॉर्मात आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आतापर्यं 9 सामन्यात सहा विजय मिळवत 12 पॉईंट मिळवले आहेत. पॉईंटटेबलमध्ये गुजरात अव्वल स्थानावर आहे. गुजरातचे आणखी 5 सामने शिल्लक आहेत. यापैकी दोन किंवा तीन सामने जिंकल्यास गुजरात सहज प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकते. सलामीचा फलंदाज शुभमन गिलसह वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमी आणि राशिद खानची कामगिरी दमदार होतेय. 


चेन्नई सुपर किंग्स
आयपीएलमध्ये चार वेळचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) गेल्या हंगामातील लाजीरवाणी कामगिरी मागे टाकत नव्या दमाने यंदाच्या हंगामात उतरला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने आतापर्यंत 10 सामन्यात 5 विजय मिळवत पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाड, कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे अशी मजबूत फलंदाजी चेन्नईकडे आहे. तर जडेजा, मोईन अली आणि तीक्षणाच्या गोलंदाजीने संघाला विजयाचा मार्ग सापडला आहे. 


मुंबई इंडियन्स
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात सुरुवातीचे सलग तीन सामने हरणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विजयाच्या मार्गावर आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने 9 पैकी 5 सामने खिशात घातले आहेत. मुंबई इंडियन्स सध्या सहाव्या स्थानावर असून त्यांचे आणखी पाच सामने शिल्लक आहेत. ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड या फलंदाजांना रोखणं भल्या भल्या गोलंदाजांना जमत नाहीए. असं असलं तरी कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. 


रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore)  यंदा आयपीएलच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आरसीबीने आतापर्यंत 9 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला असून पॉईंटटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सलामीचे फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली मैदानावर तळ ठोकतायत. तर गोलंदाज मोहम्मद सिराजही चांगल्या लयीत आहे. 


या चारही संघात जेतेपदासाठी प्रेक्षकांची गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सला सर्वाधिक पसंती मिळतेय.