IPL 2024 Auction War Between CSK And Gujarat: आयपीएल 2024 च्या लिलावाआधी भारताचा ज्येष्ठ फिरकीपटू आर. अश्विनने या बहुप्रतिक्षित लिलावाबद्दल भाकित व्यक्त केलं आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये सहभागी होणाऱ्या 10 संघांपैकी कोणता संघ कशाप्रकारे लिलावामध्ये सहभागी होईल याबद्दल भाष्य केलं आहे. संघांबद्दल बोलतानाच अश्विनने एका तरुण खेळाडूसाठी अनेक आयपीएल संघांमध्ये चढाओढी दिसून येईल असा दावा केला आहे. विशेष म्हणजे या नवख्या खेळाडूचं नाव यापूर्वीही आयपीएलच्या लिलावामध्ये वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होतं. आता अश्विनने वाटेल ती किंमत आयपीएलचे संघ या खेळाडूसाठी मोजतील आणि त्याला संघात घेण्यासाठी दोन्ही संघांमध्ये लिलावामध्ये प्राइज वॉर होईल अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


कोण आहे हा खेळाडू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आयपीएल 2024 च्या लिलावासंदर्भातील ट्रेण्डबद्दल भाष्य केलं आहे. यावेळेस अश्विनने पंजाब किंग्जसच्या संघाकडून 2022 साली खेळलेल्या एका तरुण फलंदाजांसाठी चेन्नई सुपर किंग्जस आणि गुजरामध्ये चढाओढ दिसून येईल असं म्हटलं आहे. अश्विन ज्या खेळाडूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, शाहरुख खान! प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या नावाशी साधर्म्य असल्याने अनेकदा हा खेळाडू चर्चेत आला आहे. मागील वर्षी आयपीएलच्या लिलावादरम्यान शाहरुख खानच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या टेबलवर बसलेला किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानलाही हसू अनावर झालं होतं. याच शाहरुखसाठी आता आयपीएलचे संघ आता वाटेल ती बोली लावतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया आर. अश्विनने नोंदवली आहे.


हार्दिक नसल्याने गुजरात...


"नक्कीच चेन्नई आणि गुजरातच्या संघामध्ये शाहरुख खानसाठी संघर्ष होईल असं मला आताच दिसतंय. गुजरातने हार्दिक पंड्याला जाऊ दिलं आहे. गुजराकडे आता खेळाडू कमी असून दमदार फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या ते शोधात आहेत. शाहरुख खाननला पंजाब किंग्जने 9 कोटींना विकत घेतलं होतं. त्याने उत्तम कामगिरी केली असं मला वाटतं. त्याला रिलिज करणं योग्य होतं का? मला वाटतं आता त्याला 12 ते 13 कोटी रुपयांपर्यंत बोली मिळेल," असं अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे. 


...म्हणून सीएसकेही करेल प्रयत्न


"दुसरीकडे मायकल स्टार्क नसल्याने शाहरुख खानसाठी सीएसकेही प्रयत्न करताना दिसेल. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे स्थानिक खेळाडू नाहीत. ते या लिलावामध्ये शाहरुख खानसाठी प्रयत्न करतील, असं मला वाटतंय," अशी प्रतिक्रिया अश्विनने नोंदवली आहे. 


नक्की वाचा >> धोनी IPL 2024 नंतर निवृत्त झाल्यावर CSK चा कर्णधार कोण? उत्तर सापडल्याचा अश्विनचा दावा?


त्याची कामगिरी कशी?


2022 च्या आयपीएलमध्ये शाहरुख खानने 14 सामन्यांमध्ये 156 धावा केल्या होत्या. त्याचा स्टाइक रेट हा 165.96 इतका होता. याच शाहरुखवर यंदाच्या लिलावामध्ये चांगली बोली लावली जाईल असं अश्विनला वाटत आहे.