CSK Approached This Player For Captain Post: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्लेअर्स ट्रेड आणि रिटेंशनसंदर्भातील यादी जाहीर झाल्यानंतर आता अनेक संघांबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यापैकी सर्वात मोठा प्रश्न चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसकेच्या संघासमोर आहे. मागील वर्षी चषक जिंकणाऱ्या सीएसकेचं कर्णधार पद सध्या महेंद्र सिंग धोनीकडे आहे. धोनी सध्या 42 वर्षांचा असून यंदाचं आयपीएल धोनीचं शेवटचं असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
2023 चं जेतेपद पटकावल्यानंतर चाहत्यांचं प्रेम पाहून आपण पुढील वर्षी नक्की आयपीएल खेळू असा शब्द धोनीने चाहत्यांना दिला. मात्र धोनी निवृत्त झाल्यानंतर चेन्नईचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जने बेन स्ट्रोक्सला करारबद्ध केल्यानंतर धोनीनंतरचा उत्तराधिकारी स्ट्रोक्स असेल असं मानलं जात होतं. मात्र तसं घडलं नाही. मात्र 2024 च्या लिलावाआधी सीएसकेने बेन स्ट्रोक्सला करारमुक्त करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळेच आता धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे.
असं असतानाच, एक्सवरील (ट्विटरवरील) क्रिकेट विथ रॉश नावाच्या हॅण्डलवरुन भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेलं विधान म्हणून एक पोस्ट केली. "सीएसकेच्या संघाने संजू सॅमसनला कर्णधारपदाची ऑफर दिली असून जवळपास हे निश्चित झालं होतं. मात्र संजूला काही गोष्टी पटल्यानंतर आणि त्याने ही ऑफर फेटाळली. मात्र नक्कीच या डिलला पुन्हा भविष्य आहे, असं अश्विन त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला होता," अशी पोस्ट करण्यात आली होती.
Ashwin on his YouTube channel - "Sanju Samson was approached by CSK as a captain which was nearly finalised. But it dint go through Sanju rejected their offer. Theres a definite possibility in future". #SanjuSamson #IPL2024 #iplauction2024 pic.twitter.com/DnKZ1g0nu8
— Roshmi (@CricketWithRosh) November 28, 2023
खेळाडूंचं रिटेन्शन आणि ट्रेडिंग पूर्ण झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या पोस्टला अश्विनने 29 नोव्हेंबर रोजी रिप्लाय दिला. अश्विनने या पोस्टला रिप्लाय करताना, "खोटी बातमी आहे. मी म्हणालो आहे असं सांगून खोटं बोलू नका," असं उत्तर दिलं.
Fake news! Dont lie quoting me
— Ashwin (@ashwinravi99) November 29, 2023
या उत्तरावर क्रिकेट विथ रॉश हॅण्डलवरुन मी रविचंद्रन अश्विनबद्दल बोलत नव्हतो तर मुर्गन अश्विनबद्दल बोलत होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएल 2024 च्या लिलावाआधी रविचंद्रन अश्विनने कोणता संघ कशाप्रकारे लिलावामध्ये सहभागी होईल याबद्दल भाष्य केलं. अश्विनची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.