IPL 2024 Fastest Ball:  इंडियन प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात अतिशय खराब झालीय. मुंबईला सलग तीन सामन्यात पराभवाचा धक्का बसलाय. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात तर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबईला त्यांच्या घरात घुसून हरवलं. मुंबईचा युवा वेगवा गोलंदाज आकाश मधवालची गोलंदाजी सोडल्यास राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईसाठी फारसं काही चांगलं घडलं नाही. मधवालने टिच्चून गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान चेंडूचा विक्रम


आकाश मधवालशिवाय मुंबईच्या आणखी एका गोलंदाजाने या सामन्यात इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जने (Gerald Coetzee) आयपीएलच्या यंदाच्या हंगामाती वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला. अवघ्या दोन दिवसात कोएत्जने लखनऊ सुपर जायंट्सच्या मयंक यादवचा (Mayank Yadav) रेकॉर्ड मोडला. कोएत्जने 2.3 षटकात 36 धावा दिल्या. पण एक चेंडून त्याने 157.4 किमी प्रति तास वेगाने टाकला. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला.


मयंक यादवचा विक्रम मोडला


लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात मयंकने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. पंजाबचा कर्णधार शिखर धवनही मयंकाच्या गोलंदाजीचा वेग पाहून हैराण झाला. मयंकने तब्बल 155.8 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. या सामन्यात मयंकने 27 धावा देत 3 विकेट घेतल्या.


आयपीएल 2024 मधले वेगवान गोलंदाज


गेराल्ड कोएत्जे - मुंबई इंडियंस वि. राजस्थान रॉयल्स 157.4 KM/H


मयंक यादव - लखनऊ सुपर जाएंट्स वि. पंजाब किंग्स 155.8 KM/H


मयंक यादव - लखनऊ सुपर जाएंट्स वि. पंजाब किंग्स 153.9 KM/H


मयंक यादव - लखनऊ सुपर जाएंट्स वि. पंजाब किंग्स 153.4 KM/H


नांद्रे बर्गर - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कैपिटल्स - 153 KM/H


आयपीएल पॉईंटटेबल

राजस्थान विरुद्धच्या  पराभवाने मुंबई इंडियन्स पॉईंटटेबलमध्ये एकदम तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. सलग तीन सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे. तर मुंबईचा पराभव करत राजस्थान रॉयल्स थेट अव्वल स्थानावर विराजमान झालीय. पॉईंटटेलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स तर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहे.