IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: इंडियन प्रिमिअर लीग 2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील 60 वा सामना पावसामुळे रद्द झाल्याने सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आता या स्पर्धेतील अव्वल 4 संघांपैकी केवळ एक संघ निश्चित होणं बाकी आहे. या शेवटच्या स्थानासाठी 3 संघांमध्ये अजूनही स्पर्धा असल्याचं चित्र दिसत आहे. हे तीन संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्ज्स आणि लखनऊ सुपर जायंट्स! मात्र यापैकीही के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ केवळ तांत्रिकदृष्ट्या या शर्यतीत असल्याने खरी स्पर्धा आरसीबी आणि सीएसकेमध्ये आहे. लखनऊच्या संघाचा नेट रन रेट पाहिल्यास त्यांना अव्वल 4 मध्ये स्थान मिळवता येणार नाही. मात्र दुसरीकडे चेन्नई आणि आरसीबीच्या संघाला अव्वल 4 मध्ये पात्र होण्याची उत्तम संधी आहे. या दोन्ही संघांमधील हा करो या मरोचा सामना शनिवारी होणार आहे.


सध्या पॉइण्ट्स टेबलमधील स्थिती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या संघाचे एकूण 14 पॉइण्ट्स आहेत. अंतिम चारमध्ये पात्र होण्याची त्यांची शक्यता ही आरसीबीपेक्षा अधिक आहे. पॉइण्ट्स आणि नेट रन रेटच्याबाबतीत ते आरसीबीपेक्षा सरस आहेत. त्यांचा नेट रन रेट +0.528 इतका आहे. दुसरीकडे आरसीबीचे एकूण 12 पॉइण्ट्स आहेत. मात्र या आरसीबी आणि सीएसके सामन्यावर पावसाचं सावटही असणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे झालाच नाही तर चेन्नईचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल. मात्र सामना झाला आणि चेन्नईला आरसीबीने पराभूत केलं तरी त्यांचं अव्वल चारमध्ये स्थान निश्चित आहे असं समजता येणार नाही.


आरसीबीने पहिल्यांदा बॅटींग केली तर...


आरसीबीच्या संघाला शनिवारच्या सामन्यात चेन्नईला किमान 18 धावांच्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास त्यांना 200 हून अधिक धावा करुन सामना 18 हून अधिक धावांनी जिंकवा लागणार आहे. आरसीबीने हा सामना 17 किंवा कमी धावांच्या फरकाने जिंकल्यास ते प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला. नेट रन रेट कमी असल्याने आरसीबी या सामन्यातील विजयानंतरही पाचव्या स्थानी राहील आणि चेन्नई चौथ्या स्थानी राहून पात्र ठरेल. 


चेन्नईचा संघ पराभूत झाल्यानंतरही ठरेल पात्र


आरसीबीने प्रथम गोलंदाजी करुन धावांचा पाठलाग केल्यास त्यांना 201 धावांचं लक्ष्य दिल्यास ते 11 बॉल शिल्लक असताना पूर्ण करावं लागणार आहे. असं केलं तरच त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा अधिक सरस ठरेल. म्हणजेच आरसीबीसाठी पात्र ठरण्याचं गणित सरळ आणि साधं-सोपं नाही. सध्याची स्थिती पाहिल्यास चेन्नई पात्र होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ 14 अंक असल्याने कमी फरकाने पराभूत झाला तरी अव्वल चारमध्येच कायम राहून प्लेऑफसाठी पात्र ठरेल.



लखनऊचा संघही ठरु शकतो पात्र


विशेष म्हणजे हे दोन्ही संघ पात्र न ठरता लखनऊचा संघ अव्वल चारमध्ये येण्याची धुरसशी शक्यता आहे. लखनऊच्या संघाने त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर त्यांचा नेट रन रेट आरसीबीपेक्षा सरस ठरेल आणि त्यांना पात्र होता येईल. मात्र ही शक्यता फारच कमी आहे. 


लखनऊला पात्र ठरण्यासाठी आरसीबीवर अवलंबून राहवं लागणार आहे. आपला सामना जिंकून कोहलीच्या संघाने धोनीच्या संघाला पराभूत करावं यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. कोलहीच्या संघाने हा सामना कमी फरकाने जिंकला तर सारं गणित योग्य पद्धतीने बसून लखनऊच्या संघ पात्र ठरेल.