IPL 2024 Does Rohit Sharma Playing His Last IPL: मुंबई इंडियन्सच्या संघाला इंडियन प्रिमिअर लीगच्या आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. हार्दिक पंड्याकडे कर्णधार पद सोपवल्यानंतर सलग दोन पराभव झाल्याने रोहित शर्माला कर्णधार पदावरुन बाजूला करण्याचा निर्णय चुकला की काय अशी शंका चाहते उपस्थित करत आहेत. मात्र असं असतानाच आता मुंबई इंडियन्सचा प्रमुख प्रशिक्षक असलेल्या मार्क बाऊचरच्या मुलाखतीमधील एका छोटी क्लिप व्हायरल झाली असून यंदाचं आयपीएल हे रोहित शर्माचं शेवटचं आयपीएल आहे की काय अशी शंकाही चाहत्यांनी उपस्थित केली आहे.


हार्दिक कर्णधार झाला अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर प्लेअर्स ट्रेडअंतर्गत हार्दिक पंड्याला मुंबईच्या संघाने पुन्हा संघात स्थान दिल्यापासूनच मुंबईच्या संघात पडद्यामागे बऱ्याच हलचाली घडत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हार्दिकला संघात घेतल्यानंतर अचानक रोहितचा डच्चू देत हार्दिककडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. चाहत्यांनाही हा निर्णय फारसा आवडला आहे. हार्दिक कर्णधार झाल्याने मागील 10 वर्षांपासून कर्णधार असलेला रोहित यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच फलंदाज म्हणून मुंबईकडून खेळत आहे. मात्र मैदानात हार्दिककडून रोहितला दिली जाणारी वागणूक, दोघांमध्ये वारंवार उडणार खटकेही चर्चेत आहेत. असं असतानाच आता रोहित शर्माचं हे शेवटचं आयपीएल आहे की काय असं मार्क बाऊचरने आयपीएल सुरु होण्याच्या काही दिवस आधी दिलेल्या एका मुलाखतीच्या आधारे विचारलं जात आहे.


नक्की वाचा >> 'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर


नेमकं काय म्हणालेले मुंबईचे प्रशिक्षक?


आयपीएल सुरु होण्याच्या काही दिवस आधी मार्क बाऊचर एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. त्याने या मुलाखतीत मुंबईचा कर्णधार बदलला गेल्यासंदर्भात भाष्य केलं. या व्हिडीओवर रोहित शर्माची पत्नी ऋतिकाने कमेंट करत मार्क बाऊचरवर निशाणा साधला. त्यानंतर व्हिडीओ अपलोड करणाऱ्याने तो डिलीट केला. पण याच मुलाखतीमध्ये मार्क बाऊचरने रोहितचं हे शेवटचं आयपीएल असं शकतं अशी शक्यता व्यक्त केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेण्यात आला याचसंदर्भात मार्क बाऊचर बोलत होता. त्यावेळेस त्याने, "मला वाटलं की आम्ही मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण टीमबरोबर बोलत होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की तो यंदा (आयपीएलच्या) त्याच्या शेवटच्या वर्षात पाऊल ठेवत आहे," असं विधान केलं. 


नक्की वाचा >> हार्दिक पंड्यासाठी Warning! 'मुंबईमध्ये खेळशील तेव्हा...'; रोहितच्या नावाने डिवचण्यावरुन इशारा



मुंबईच्या संघाला पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध पराभवाचं तोंड पहावं लागलं तर दुसऱ्या सामन्यात मुंबईला सनरायझर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारत 31 धावांनी पराभूत केलं.