चेन्नई: आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाल चेन्नईत सुरुवात झाली आहे. यंदा सर्वाधिक महागडा खेळाडू आयपीएलसाठी मिळाला आहे. या खेळाडूनं आतापर्यंतचे सर्वांचे रेकॉर्ड तोडले तर या खेळाडूची किंमत ऐकून धक्काच बसला आहे. राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक बोली लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा पहिल्यांदाच सर्वाधिक बोली ग्लेन मॅक्सवेलवर लावण्यात आली आहे. पहिल्याच टप्प्यात सर्वाधिक बोली लागलेला दोन खेळाडू आहेत. RCBला टक्कर देण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स सज्ज झाला आहे. या संघानं क्रिस मॉरिसवर 16.25 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतलं. तर RCB आपल्या संघात हा खेळाडू लिलावाच्या सुरुवातीलाच घेईल अशी चर्चा होती. त्यानुसार रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावाच्या सुरुवातीलाच ग्लेन मॅक्सवेलवर बोली लावून त्याला RCB संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. 


ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांच्या लिलावानंतर RCBने आपल्या संघात दाखल करून घेतलं आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार सर्वाधिक बोली लावलेला दुसरा पहिलाच खेळाडू आहे. त्यानंतर मोईन अली 7 कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल झाला आहे. 


ग्लेन मॅक्सवेल हा जगातल्या तुफान फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. कोणतीही टीम मॅक्सवेलमध्ये (ग्लेन मॅक्सवेल) असेल तर ती इतर संघासाठी समस्या निर्माण करू शकते. मागील हंगामातील ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी खराब राहिल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला त्यांच्या संघातून बाहेर केलं. आरोन फिंचच्या सुटकेनंतर आरसीबीला परदेशी सलामीवीरांची आवश्यकता आहे. त्यामुळे RCB ने ही गरज ओळखून ग्लेन मॅक्सवेलची निवड केल्याचं सांगितलं जात आहे.