IPL Auction 2023 Unsold Plyaer : नुकताच IPL 2023 चा लिलाव पार पडला, यावेळी सॅम करनला आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. या लिलावामध्ये परदेशी खेळाडूंनी चांगलेच पैसे छापले, मात्र काही मोठ्या खेळाडूंना एकाही संघाने खरेदी केलं नाही. यामध्ये मोठी नावं असलेले खेळाडूही Unsold राहिले. यामध्ये एक खेळाडू असा आहे की कोणीही विचार केला नसेल की तो यंदाच्या लिलावामध्ये Unslod राहिल. (IPL Auction 2022 Unsold Plyaer Sandeep Sharma dismissed Virat and Rohit latets marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे हा खेळाडू 
संदीप शर्मा असं खेळाडूचं नाव असून त्याने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त IPL सामने खेळले आहेत. लिलावाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये त्याच्यावर कोणी बोली लावली नाही. संदीप शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 114 विकेट्स घेतल्या आहेत. संदीप शर्माची या लिलावामध्ये 50 लाख मूळ किंमत होती. मात्र एकाही फ्रँचायजीने त्याच्यावर बोली लावली नाही. 


संदीप शर्मा 2013 पासून आयपीएल खेळत आहे. 29 वर्षाच्या संदीपने आतापर्यंत भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला 7 वेळा बाद केलं आहे. त्यासोबतच संदीपने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि आक्रमक ख्रिस गेलला 4 वेळा तर मिस्टर 360 डिग्री ए बी डिव्हिलियर्सला दोनवेळा बाद केलं आहे. संदीप पॉवर प्लेमध्येही गोलंदाजी करत विरोधी संघाच्या सुरूवातीच्या विकेट्स घ्यायचा. 


दरम्यान, 2013 साली संदीपने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. सलग 9 वर्षे संदीप आयपीएल खेळत आला होता. 104  सामन्यांमध्ये संदीपने 114 बळी घेतले आहेत. पंजाब संघाकडून खेळताना 73 तर सनराईजर्स हैदराबादसाठी 41 बळी घेतलेत. संदीपला कोणत्याही संघाने विकत न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.