मुंबई: बंगळुरू विरुद्ध आज कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सामना चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत. विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी तयार आहे. कोलकाता संघातील खेळाडू आता बंगळुरू संघावर भारी पडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता विरुद्ध बंगळुरू IPLच्या इतिहासात आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत. त्यापैकी 14 सामने कोलकाता जिंकलं आहे. तर 12 सामने बंगळुरू संघ जिंकलं आहे. तर मागच्या 5 सामन्यांमध्ये बंगळुरू संघ विजयाची भूमिका निभावताना दिसत आहे.



मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद संघाला पराभूत करून दोन सामने कोहलीचा संघ जिंकला आहे. त्यामुळे आताचा सामना देखील विराट कोहलीचा संघ जिंकणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


बंगळुरू संघ प्लेइंग इलेव्हन


विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, शाहबाज अहमद, ग्लॅन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, रजत पट्टीदार, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमिनसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल


कोलकाता प्लेइंग इलेव्हन


नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयोन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक ,आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती