Rinku Singh: पहिल्याच इनिंगमध्ये चमकला रिंकू सिंग; आयर्लंडच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं; पाहा Video
Rinku Singh Video: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs IRE) डब्लिन खेळल्या गेलेल्या दुसरा सामन्यात रिंकू सिंगने धुंवाधार फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ पाहा...
India vs Ireland 2nd t20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs IRE) डब्लिन खेळल्या गेलेल्या दुसरा सामन्यात टीम इंडियान विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या होत्या. या सामन्यात उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याने चमक दाखवली. त्याने 43 चेंडूत सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनने 26 बॉलमध्ये 40 धावांचं बहुमुल्य योगदान दिलं. मात्र, या सामन्यात सर्वात विश्वासू ठरला तो रिंकू सिंग (Rinku Singh)...
आयर्लंडची बॉलिंग चालू होती. सामना 18 व्या ओव्हरमध्ये आला. तोपर्यंत भारताच्या 143 धावा झाल्या होत्या. त्यावेळी मैदानात होते टीम इंडियाचे दोन युवा फिनिशर... रिंकू सिंह आणि शिवम दुबे. रिंकू सिंग (Rinku Singh) आणि शिवम दुबे (Shivam Dubey) यांनी शेवटच्या दोन षटकांत 42 धावा जोडून भारताची धावसंख्या 185 धावांवर नेली. दोन षटकात त्यांनी 5 सिक्स खेचत आयर्लंडच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं. गेम फिरला खरा तो याच दोन ओव्हरमध्ये. रिंकू सिंगने 3 तर शिवम दुबेने 2 षटकार खेचले.
पाहा Video
रिंकू सिंग आणि शिवम दुबे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. मात्र रिंकू सिंग अगदी अखेरच्या बॉलवर बाद झाला. रिंकूने 21 बॉलमध्ये 180.95 च्या स्ट्राईक रेटने 38 धावा केल्या. त्यात रिंकूने 3 सिक्स आणि 2 फोर खेचले. मागील सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आता पहिल्या इनिंगमध्ये त्याने आपल्या बॅटची चमक दाखवली आहे. या सामन्यात त्याला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
आणखी वाचा - 'आईने कर्ज काढून मला...', टीम इंडियासाठी डेब्यू झाल्यावर रिंकू सिंह भावूक
काय म्हणाला रिंकू सिंग?
आजचा सामना खेळून मला समाधान वाटलं. मी टीम इंडियामध्ये खेळण्याच्या संधीची वाट पाहत होतो. गेल्या 10 वर्षाच्या मेहनतीचं हे फळ आहे. माझा आयपीएलपासून ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास खूप सुखद होता. आजच्या सामन्यात मी पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही खेळत राहिल, असं रिंकू सिंह म्हणाला आहे.