ईशान किशनसाठी पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे? `या` सीरिजमध्ये होणार कमबॅक, शुभमनबद्दल मोठी अपडेट
19 सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा टेस्ट सीरिज खेळणार आहे. 19 सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाणार आहे. तर यानंतर बांगलादेश विरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाईल.
ईशान किशनचं पुनरागमन :
बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजनंतर लगेच काही दिवसात सुरु होणाऱ्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाच्या काही स्टार खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. टीम इंडिया ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. तेव्हा या सीरिजसाठी खेळाडूंनी सराव करावा आणि आपलं लक्ष केंद्रित करावं यासाठी बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजमधून टीम इंडियाच्या काही खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, पुढील न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळण्यासाठी ऋषभ पंतला आराम दिला जाऊ शकतो. ऋषभ पंतला निवडसमितीने आराम दिला तर त्याच्या ऐवजी ईशान किशनची विकटकीपर फलंदाज म्हणून वर्णी लागू शकते. ईशान किशनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियात खेळण्याची संधी मिळालेली नाही. डिसेंबर महिन्यात टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना ईशान किशनने मानसिक स्वास्थ्याच कारण देत माघार घेतली होती. यानंतर त्याला टीम इंडियात संधी मिळावी नाही तसेच बीसीसीआयने वार्षिक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द केलं.
धवन-कार्तिक नंतर भारताचा 'हा' दिग्गज क्रिकेटरही करू शकतो निवृत्तीची घोषणा, लवकरच घेणार निर्णय?
पीटीआयला एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, " हो शुभमनला बांगलादेश विरुद्ध टी 2 सीरिजमध्ये आराम दिला जाईल. जर तुम्ही सामन्यांची संख्या पाहाल , तर बांगलादेश विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरिज ही 6 ऑक्टोबर रोजी ग्वालियर, 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली तर 12 ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे होईल. मग पुन्हा 16 ऑक्टोबर पासून न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीज खेळवली जाईल. त्यामुळे शुभमन गिलला ब्रेक देणे महत्वाचं आहे. शुभमन गिल सह ऋषभ पंतला सुद्धा टी 20 सिरीजमधून आहेर करण्यात आले तर यामुळे ईशान किशनचे कमबॅक होऊ शकते.