2024 वर्षाच्या मध्यापर्यंत भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यात दिनेश कार्तिक, शिखर धवन, केदार जाधव अशा अनेक क्रिकेटर्सचा समावेश आहे. केवळ भारतीयच नाही तर डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अली सारख्या विदेशी क्रिकेटर्सनी देखील निवृत्तीचा निर्णय घेतला. आता या लिस्टमध्ये अजून एका भारतीय क्रिकेटरच्या नावाचा समावेश होऊ शकतो. भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा पोस्ट व्हायरल होतं आहेत.
गोलंदाज भुवनेश्वर यादवने 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, भुवनेश्वर लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो. मात्र झी 24 तास या दाव्यांची पुष्टी करत नाही. भुवनेश्वर कुमार याला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्याने भारताकडून शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. नोव्हेंबर 2022 च्या टी20 सामन्यामध्ये भुवनेश्वरला एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. तर हा सामना डकवर्थ लुईस नियमनुसार टाय झाला होता.
हेही वाचा : IND VS BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच; कधी, कुठे पाहता येणार फ्री?
भुवनेश्वर यापूर्वी जुलै 2023 मध्ये सुद्धा बराच चर्चेत आला होता. याच कारण म्हणजे त्याने पूर्वी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर इंडियन क्रिकेटर असं लिहिलं होतं. मात्र त्यानंतर त्याने 'क्रिकेटर' हा शब्द हटवून फक्त 'इंडियन' हा शब्द ठेवला होता. यामधून तो निवृत्तीचा संकेत देत आहे असे म्हटले जात होते. मात्र स्वतः भुवनेश्वरने आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Big Breaking:
Bhuvneshwar Kumar may retire from international cricket soon.#INDvsPAK #Hockey #DuleepTrophy #ViratKohli Bumrah #SuryakumarYadav Pakistan #INDvBAN Morne Morkel #TeamIndia pic.twitter.com/kY02rw7x5W
— Cricket Kota Factory (@cricketkot44370) September 14, 2024
भुवनेश्वर कुमार याने 25 डिसेंबर 2012 रोजी पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या करिअरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानी फलंदाजाला आपल्या स्विंगमने फसवलं होतं. त्याने आपल्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नासिर जमशेदला इन-स्विंग गोलंदाजी करून क्लीन बोल्ड केले. या सामन्यात त्याने 4 ओव्हर गोलंदाजी करून 10 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.