आयपीएलच्या नव्या नियमांमुळे वाद, `या` खेळाडूकडून प्रश्न उपस्थित
आयपीएलचे बदलेले नियम एका खेळाडूला पटले नाहीत. या खेळाडूने ट्विट करून आयपीएलच्या बदललेल्या नियमांना विरोध केला आहे.
मुंबई : 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा सिझन सुरु होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक बदल पहायला मिळणार आहेत. 15 व्या सिझनमध्ये 8 नव्हे तर 10 टीम्स खेळणार आहेत. यासोबत अजून म्हणजे खेळाच्या नियमांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही नियम असे आहेत ज्यामुळे फायदा होणार आहे तर काही नियमांमुळे केवळ एकाच टीमचा फायदा होणार आहे. मात्र या नियमांना आता एका खेळाडूने नासपंती दाखवली आहे.
न्यूझीलंडच्या एका खेळाडूला हे बदलेले नियम पटले नाहीत. या खेळाडूने ट्विट करून आयपीएलच्या बदललेल्या नियमांना विरोध केला आहे.
मेलबोर्न क्रिकेट क्लबने नुकतंच क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले. यानंतर आयपीएलमध्येही खेळाच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. यामधील एक नियम म्हणजे, जर फलंदाज कॅच आऊट झाल तर येणारा नवा खेळाडू स्ट्राईकवर राहणार. भलेही दोन्ही खेळाडूंनी क्रिजवर क्रॉस केलं असेल.
हा नियम न्यूझीलंडच्या जेम्स निशमला हा नियम आवडलेला नाही. नीशमने याबाबत ट्विट केलं आहे. तो म्हणाला, "मला अजूनही यामागचं कारण समजलेलं नाही. या नियमात कोणाला कधी समस्या निर्माण झाली का? त्यामुळे सामन्याच्या परिस्थितीची माहिती नसलेल्या फलंदाजाला अडचणी निर्माण होतील. मला हे अजिबात आवडलेलं नाही."
आयपीएल 2022मध्ये जेम्स निशम राजस्थान रॉयल्सच्य ताफ्यातून खेळणार आहे. नीशमला राजस्थानने 1.50 कोटी देत आपल्या ताफ्तात घेतलं आहे. गेल्या आयपीएलमध्ये नीशम मुंबईकडून खेळत होता. त्याचसोबत तो दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सकडून खेळला आहे.